शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 12:26 IST

Mumbai-Nagpur high speed railway : मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे (एमएनएचएसआर) औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मुंबई-नागपूर अतिजलद रेल्वेच्या (एमएनएचएसआर) कामाचा ( Mumbai-Nagpur high speed railway) नारळ नवीन वर्ष २०२२ मध्ये फुटण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या कामासाठी मार्च २०२१ मध्ये लीडर भूसर्वेक्षणास (लाईट डिटेक्शन ॲण्ड रेंजिंग- टोपोग्राफिक सर्व्हे फाॅर बुलेट ट्रेन) सुरुवात झाली होती. ते काम जवळपास संपले असून डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे काॅरिडॉरसाठी डीपीआर करण्यासाठी लीडर सर्वेक्षण करण्यात आले. या तंत्रज्ञानाने जमिनीचा तपशील संकलित करण्यासाठी साधारणत: ५ महिन्यांचा कालावधी लागला. पूर्वी हे काम करण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागायचा. ७३६ कि.मी. अंतरात लेझर डेटा, जीपीएस डेटा, फ्लाईट पॅरामीटर्स आणि छायाचित्रांचे संकलन करण्याचे काम संपले आहे. जमीन, पायवाटा, रस्ते, वृक्ष यांची छायांकित माहिती सर्वेक्षणातून संकलित केली आहे. मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे (एमएनएचएसआर) औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून सुविधायुक्त कार्यालय तयार ठेवले आहे. या कामासाठी जपान येथील तंत्रज्ञांचे शिष्टमंडळ नववर्षात येणार आहे.

हाय स्पीड रेल्वेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. जिल्ह्यात हाय स्पीड रेल्वेचा १११ कि.मी. ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून समृध्दी महामार्गालगत समांतरपणे त्या ट्रॅकची बांधणी होईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे काॅपोर्रेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरनुसार काम हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, कंत्राटदार नेमणे याची माहिती २०२२ मध्ये समोर येईल. एमएनएचएसआरचे राहुल रंजन यांनी सांगितले, लीडर सर्व्हेचे काम संपले असून डीपीआरचे कामही झाले आहे. यापुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील.

इतर कामांसाठी पाठपुरावा सुरूजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, नवीन वर्षांत हाय स्पीड रेल्वेच्या कामाला सुरुवात होणे शक्य आहे. रेल्वेच्या इतर कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्थानिक आहेत. त्यामुळे कामांना गती मिळेल. हायस्पीड रेल्वेच्या कामासाठी पहिले कार्यालय औरंगाबादेत सुरू केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादnagpurनागपूरrailwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन