शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सावळागोंधळ... वायपर बिघडल्यानं तब्बल चार तास रखडलं एअर इंडियाचं विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 18:45 IST

मुंबई विमानतळावरून औरंगाबादसाठी एअर इंडियाचे AI 442 हे विमान दुपारी ३.२५ मिनिटांनी उड्डाण करणार होते.

मुंबई : एअर इंडिया आणि भोंगळ कारभार हे जणू समानार्थी शब्दच झाले आहेत. त्यांच्या नियोजनशून्यतेची अनेक उदाहरणं आपण ऐकतो, वाचतो. याच ढिसाळ कारभाराचा अनुभव आज मुंबई-औरंगाबाद (AI 442) विमानातील प्रवाशांना आला. तांत्रिक बिघाडामुळे उ्डडाण अर्धा तास उशिराने होईल, अशी उद्घोषणा पायलटने केली. पण, पुढचे तब्बल दोन तास विमान जागच्या जागी उभं होतं आणि प्रवासीही कुठल्याही सूचनेविना ताटकळत बसले होते. आता दुसरे विमान ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना चार तास विमानतळावरच थांबावे लागले आहे.

मुंबई-औरंगाबाद विमानाची नियोजित वेळ दुपारी ३.२५ ची होती. त्यानुसार, ३.१० वाजता प्रवाशांना विमानात प्रवेश देण्यात आला. सगळे जण स्थिरस्थावर होतात न होतात, तोच विमानात तांत्रिक बिघाड असल्याची उद्घोषणा पायलटने केली. विमानाचे वायपर नादुरुस्त झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे ४ वाजेपर्यंत विमान टेक-ऑफ करेल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, सव्वा पाच वाजले तरी विमान जागेवरून हलले नाही. नेमकं काय झालंय, हे सांगण्याचं सौजन्यही कुणी दाखवलं नाही. उलट, ग्राउंड स्टाफ आणि फ्लाईट स्टाफ यांच्यातच खटके उडत होते. नियोजनाचा पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. संतापलेल्या प्रवाशांनी याबाबत वैमानिक व केबिन क्रू ना जाब विचारल्यावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या विमानातून औरंगाबाद प्रवास करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. 

हे दुसरे पर्यायी विमान आता ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल चार तास विमानतळावरच ताटकळत बसावे लागणार आहे. एअर इंडियाच्या या कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या घटनेत, एअर इंडियाच्याच दुपारी २.४५ वाजता भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला देखील विलंब झाल्याचे समोर आले आहे. हे विमान भोपाळहून दिल्ली जाण्यासाठी हे विमान भोपाळमध्ये आलेले नसल्याने प्रवासी विमानतळावर रखडले आहेत. हे विमान तांत्रिक अडचणींमुळे रात्री १० वाजता येईल, अशी माहिती व्यवस्थापकाने सुरुवातीला दिली होती. मात्र नंतर हे उड्डाण रद्द केल्याची माहिती प्रवाशांना देण्यात अली. विमानातून प्रवास करणाऱ्या ८० पेक्षा जास्त प्रवाशांना इतर ठिकाणी जायचे असल्याने त्यांचा पुढील विमान प्रवास देखील बारगळला आहे. प्रशासनाने पर्यायी विमानाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबई