शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

मुगळीकर यांचा औरंगाबाद महानगरपालिकेतील कार्यकाळ खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:59 IST

महसूल विभागात कामाचा ठसा उमटविणारे डी.एम. मुगळीकर यांना शासनाने औरंगाबाद महापालिकेत विशेष बाब म्हणून मागील वर्षी आणले होते.

औरंगाबाद : महसूल विभागात कामाचा ठसा उमटविणारे डी.एम. मुगळीकर यांना शासनाने औरंगाबाद महापालिकेत विशेष बाब म्हणून मागील वर्षी आणले होते. आपल्या अवघ्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धार्मिक स्थळांच्या कारवाईत मुगळीकर कमालीचे अडचणीत सापडले होते. या अडचणीतून कसेबसे बाहेर निघताच कचराकोंडीने त्यांना जेरीस आणले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शासनाने त्यांच्या बदलीचे पाऊल शुक्रवारी उचलले.

महापालिकेत ओम प्रकाश बकोरिया आणि पदाधिकार्‍यांचे खटके उडू लागले. महापालिका काय असते, येथील कामकाज कसे करावे लागते, नागरिकांसाठी काम कसे करावे, याची शिस्त बकोरिया यांनी लावली होती. त्यांच्या या शिस्तप्रिय कारभारामुळे भाजपच्या एका गोटात कमालीची अस्वस्थता होती. या गटाने मुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रारी करून बकोरिया यांची बदली केली. ‘भोकरदन’ ट्रॅकवर काम करणार्‍या नगरसेवकांनी सोयीचे अधिकारी म्हणून डी.एम. मुगळीकर यांना महापालिकेत आणले. २४ एप्रिल २०१७ रोजी मुगळीकर यांनी एकतर्फी पदभार स्वीकारला होता. ते रुजू झाल्यानंतर सर्वांत मोठे संकट धार्मिक स्थळांचे आले. ४५ पेक्षा अधिक धार्मिक स्थळे पाडण्यात आली. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. कायद्याचा धाक दाखवून महापालिकेने कशीबशी कारवाई नेटाने सुरूच ठेवली. शेवटी धार्मिक स्थळांचे वर्गीकरण केल्यामुळे वाद शांत झाला. 

वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मुगळीकर यांच्यावर खंडपीठात अवमान याचिकाही दाखल झाल्या. प्रत्येक प्रकरणात कसेबसे दिवस काढत असताना अचानक कचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला. एक महिना झाला तरी शहरातील कचराकोंडी फोडण्यात त्यांना यश आले नाही. त्यातच मिटमिटा येथील दंगलीने कचर्‍याचा अक्षरश: वनवाच पेटला. या वनव्याची झळ अगोदर पोलीस आयुक्तांना बसली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी मुगळीकरही यापासून वाचू शकले नाहीत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद