शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

औरंगाबादकरांना महावितरणने दिला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:41 IST

औरंगाबाद : ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर महावितरणने औरंगाबादकरांना लोडशेडिंग करून सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. शहरात सोमवारी तब्बल सव्वानऊ तास विद्युत ...

ठळक मुद्देशहरात अचानक सव्वानऊ तास लोडशेडिंग

औरंगाबाद : ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर महावितरणने औरंगाबादकरांना लोडशेडिंग करून सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. शहरात सोमवारी तब्बल सव्वानऊ तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला. कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीकडून मागणीनुसार विजेचा पुरवठा होऊ शकला नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार महावितरणला तातडीचे भारनियमन करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सूत्रांनी सांगितले.गेल्या वर्षीदेखील आॅक्टोबरमध्येच भारनियमन राबविण्यात आले होते. आज शहरात राबविण्यात आलेल्या भारनियमनासंबंधी वीज ग्राहकांना महावितरणकडून कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आल्या नव्हत्या. सकाळी साधारणपणे ९ वाजेच्या सुमारास महावितरणच्या मुख्यालयाकडून अधिकाऱ्यांना तात्काळ भारनियमन करा, अशा सूचना मिळाल्या. त्यानुसार शहरातील महावितरणच्या शहर विभाग क्रमांक- १ व २ मध्ये भारनियमन करण्यात आले. प्रामुख्याने वीज बिल नियमित न भरणारे ग्राहक, विजेचा अनधिकृत वापर आणि वीज गळतीचे प्रमाण अधिक असणारे फिडर (जी-१, जी-२ आणि जी- ३) तात्काळ बंद करण्यात आले. अगोदरच ‘आॅक्टोबर हिट’ आणि त्यात भारनियमनामुळे आज दिवसभर नागरिक वैतागले. कोळशाची टंचाई आणि दुसरीकडे विजेचा वाढलेला वापर यामुळे तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले. शहर विभाग क्रमांक १ अंतर्गत तब्बल ३३ फिडर बंद करण्यात आले होते. यामध्ये जी-१ अंतर्गत दोन टप्प्यांत पावणेआठ तास, जी-२ अंतर्गत साडेआठ तास आणि जी-३ अंतर्गत सव्वानऊ तास भारनियमन करण्यात आले. वीजनिर्मिती करणाºया संचांना कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संचांना कोळसा मुबलक प्रमाणात प्राप्त होईल, तेव्हा भारनियमन रद्द केले जाईल, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.चौकट ....या परिसरात होते भारनियमनपावर हाऊस उपविभागांतर्गत भडकलगेट, टाऊन हॉल, जयभीमनगर, नूर कॉलनी, नेहरू भवन, जामा मशीद, विद्युत कॉलनी, आरेफ कॉलनी, गौतमनगर, घाटी परिसर, प्रगती कॉलनी, आसेफिया कॉलनी, मकई गेट परिसर, बेगमपुरा, लालमंडी, कुतुबपुरा, जयसिंगपुरा, छावणी उपविभागांतर्गत सिल्क मिल कॉलनी, सादातनगर, राहुलनगर, जालाननगर, महानुभाव आश्रम, दिशा संस्कृती, इटखेडा, तापडिया पार्क, छावणी, नेहरूनगर, ख्रिस्तनगर, चांदमारी, नंदनवन कॉलनी, मिलिंद कॉलेज, पीईएस अभियांत्रिकी कॉलेज, भीमनगर, भुजबळनगर, सातारा तांडा, भावसिंगपुरा, भीमनगर, पेठेनगर, कासंबरी दर्गा, पडेगाव, मिटमिटा, देवगिरी व्हॅली, तारांगण परिसर, शहागंज उपविभागांतर्गत जुना शहाबाजार, राजाबाजार, जिन्सी, कैसर कॉलनी, रणमस्तपुरा, चाऊस कॉलनी, निजामुद्दीन रोड, मदिना मार्केट, घासमंडी, चेलीपुरा, स्टेट टॉकीज, गांधी भवन, आमखास, कबाडीपुरा, किलेअर्क, लेबर कॉलनी, सिटीचौक, लोटाकारंजा, कासारी बाजार, रोहिला गल्ली, फाजलपुरा, एस.टी. कॉलनी, गणेश कॉलनी, रशीदपुरा, आलमगीर कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, रोजाबाग, एन-१२, एसबीएच कॉलनी, मिसारवाडी, रहेमानिया कॉलनी, राममंदिर, यशोधरा कॉलनी, किराडपुरा, मकसूद कॉलनी, हर्सूल, जहांगीर कॉलनी, फातेमानगर, एकतानगर, होनाजीनगर, राजनगर, राधास्वामी कॉलनी, वाळूज उपविभागांतर्गत पंढरपूर, नायगाव, पंढरपूर रोड आदी.शहर विभाग क्रमांक-२ अंतर्गत नारेगाव फिडर, सिडको (संजयनगर) फिडर, चिकलठाणा फिडर, मोंढा फिडर, निजामोद्दीन फिडर, सेव्हन हिल फिडर, क्रांतीचौक, मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, सुराणानगर आदी परिसरात लोकशेडिंग करण्यात आले.

टॅग्स :electricityवीज