शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका, फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो..."; मनोज जरांगे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 19:41 IST

"ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे."

मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसींची मोट बांधून पाठबळ द्याल आणि मराठ्यांवर अन्याय कराल, तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रात पान नाही हालू शकत. एवढेच नाही, तर त्यांना (ओबीसी) पाठबळ द्याल आणि त्या सर्वांना आमच्या अंगावर घालाल आणि ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

जरांगे म्हणाले, "आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचे म्हणाले, आता त्यांचा बसल्यावर नाही झाली का जातीय तेढ निर्माण? ते बसल्यावर नाही का गर्दी झाली? ते गेल्यावर नाही का एसटी थांबायला त्रास झाला? ते बसल्यावर नाही का शाळेत जाणाऱ्या लोकांना त्रास झाला? हे काम छगण भुजबळ करत आहेत. त्या आंदोलन करणाऱ्यांना दोषच नाही आमचा. कारण छगण भुजबळ यांनी जाहीर सांगितले आहे की, ते माझे लोक आहेत. मी बसवले आहेत. म्हणजे तू घडवून आणतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कळत नाही का हे? मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसींची मोट बांधून पाठबळ द्याल आणि मराठ्यांवर अन्याय कराल, तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रात पान नाही हालू शकत."

जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही -"तुम्ही आम्हालाही चुचकारताल फडणवीस साहेब आणि त्यांनाही चुचकारताल आणि पुन्हा मराठ्यांचा घात कराल. नेरेटिव्ह पसरवला, नरेटिव्ह पसरवला, तो मी भरून काढणार आहे, या नावाखाली त्यांना पाठबळ द्याल आणि त्या सर्वांना आमच्या अंगावर घालाल आणि ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, असेल तर म्हणतोय मी. मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही," असेही जरांगे म्हणाले. 

तर एकही मराठा त्यांच्यासोहत राहणार नाही -"मराठ्यांवर १३ तारखेपर्यंत अन्याय झाला, तर मराठे एकिकडून आहेत. तुमच्या पक्षातील सुद्धा. ते सुद्धा आता सहन करू शकत नाहीत, मराठ्यांचे नेते. जर तुमच्या पक्षातील मराठा नेते एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय बघून, सहन करून तुमच्या सोबतच राहीले, तर एकही मराठा त्यांच्यासोहत राहणार नाही. कारण भाजपमधील मराठ्यांची जात वाचवणेही जबाबदारी आहे. फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, असेही जरांगा यावेळी म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे