शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मराठवाड्यात आंदोलनाचे लोण पसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:50 IST

मराठा आरक्षण; परळीतील ठिय्या सुरूच, कळंब बंद; जालन्यात बसवर दगडफेक; काही ठिकाणी रास्ता रोको

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील परळी येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन रविवारीही सुरूच असून मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण मराठवाड्यात पसरले आहे. हिंगोलीपाठोपाठ जालन्यात बसवर दगडफेक झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंबला बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रास्ता रोको झाले.मेगा नोकरभरती रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही परळीतून परतणार नाही, अशी माहिती मराठा मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी रविवारी परळीत दिली. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे चक्काजाम आंदोलन झाले. भूम तालुक्यातील ईट येथे जाळपोळ झाली.नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले. रविवारी ज्येष्ठ नागरिकांनी ठिय्या दिला़ जालन्यात बसवर दगडफेक झाली. मंठा येथे १२ आंदोलकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. भोकरदन येथेही रास्ता रोको झाले. परभणीत मानवत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. परभणी- पाथरी बसवर दगडफेक झाली.औरंगाबादला क्रांती चौकात आंदोलन सुरूच आहे. पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांना त्रास होईल, असे आम्ही काहीही करणार नाही. मात्र आमच्या नावावर अन्य कोणी अनुचित प्रकार घडवू शकते, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले. येथे शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे.सोलापुरात दोन दिवसांत ५० बस फोडल्यासकल मराठा समाजाने केलेल्या चक्काजाम आंदोलनात झालेल्या हिंसाचारात सोलापूर जिल्ह्यात २२ एसटी बसचे नुकसान झाले. शनिवार व रविवारी एकूण ५० बसचे ३० लाखांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री आंदोलकांनी दोन गाड्या पेटवून दिल्या. पंढरपुरात चक्का जाम आंदोलनाच्या भीतीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल : राज ठाकरेमराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री हे राज्याची दिशाभूल करत असून, शासनाकडून ज्या नोकºया दिल्या जात आहेत त्याची टक्केवारी नगण्य आहे. खासगी क्षेत्रात यापेक्षा जास्त संधी आहेत, परंतु, खासगीत अद्याप आरक्षण लागू नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करू देण्यासाठीचे आंदोलन चुकीचे आहे. पंढरपूर हे आंदोलनाचे ठिकाण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.मुद्दा चिघळण्यास शासनच जबाबदार : राणेमराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने वेळेत आपले म्हणणे न्यायालयात सादर केले असते, तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली असती तर निर्णय लगेचच लागला असता. मात्र, तसे न झाल्याने आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम पाळला आहे. यापुढे त्यांचा अंत शासनाने पाहू नये, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाAurangabadऔरंगाबाद