शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:16 IST

शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेडले. त्यामुळे मनपा प्रशासन त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देदुसºया दिवशीही काम बंद : मनपा प्रशासन त्रस्त

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेडले. त्यामुळे मनपा प्रशासन त्रस्त झाले आहे.घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, संकलित कचरा नियोजित प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम मनपाने बंगळुरूच्या पी.गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. फेबु्रवारीपासून कंपनीने शहरात कचरा संकलन सुरू केले असून, सध्या सहा झोनमध्ये कंपनीकडून काम केले जात आहे. कंपनीने दोन महिन्यांचा पगार न दिल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीने थकीत वेतन द्यावे, यासाठी कामगारांना आंदोलन करावे लागत आहे. सोमवारी झोन ३ मधील कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते. मंगळवारी पुन्हा झोन क्रमांक २, ७ आणि ९ मधील कंपनीच्या सफाई कामगारांनी भाजपप्रणीत बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच कामबंद आंदोलन केले. ६ पैकी ३ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंद झाल्याची माहिती समजताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी रमानगर येथील केंद्रावर धाव घेत कामगारांची समजूत काढली. वेतन थकल्याने कामगार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महापौरांनी लेखाधिकारी महावीर पाटणी आणि घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना बोलावून दोन दिवसांत कामगारांचे वेतन करण्याचे निर्देश दिले. अखेर कामगारांनीही आंदोलन मागे घेतले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु झोन क्रमांक दोनचे काम दिवसभर ठप्पच होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न