शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

औरंगाबादेत उपमहापौर सव्वा वर्षातच बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 11:38 IST

महापालिकेत अडीच वर्षांसाठी भाजपच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद सव्वा वर्षातच बदलावे, त्या ठिकाणी पक्षातील एखाद्या नगरसेवकाला संधी देऊन उपकृत करावे, अशी मागणी भाजपमधील एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची चर्चा सुरू असून, त्या मागणीच्या अनुषंगाने उपमहापौरपद सव्वा वर्षात बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्देविद्यमान उपमहापौर विजय औताडे यांची महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी प्रचंड जवळीक निर्माण झाली आहे. ते भाजपचे आहेत की, शिवसेनेचे हे कळण्यास मार्ग नसल्याची खंत काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे.

औरंगाबाद : महापालिकेत अडीच वर्षांसाठी भाजपच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद सव्वा वर्षातच बदलावे, त्या ठिकाणी पक्षातील एखाद्या नगरसेवकाला संधी देऊन उपकृत करावे, अशी मागणी भाजपमधील एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची चर्चा सुरू असून, त्या मागणीच्या अनुषंगाने उपमहापौरपद सव्वा वर्षात बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

विद्यमान उपमहापौर विजय औताडे यांची महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी प्रचंड जवळीक निर्माण झाली आहे. या जवळीकतेमुळेच औताडे यांना चारचाकी वाहन मिळाल्याची चर्चा आहे. तसेच कर्ज काढण्यासारख्या प्रकरणात चर्चा करण्याऐवजी उपमहापौर सभागृहातून काही वेळेसाठी बाहेर गेले होत. ठरावावरील चर्चा अंतिम टप्प्यात आल्यानंतर ते सभागृहात आले, त्यांची गैरहजेरी सेनेच्या धोरणासाठी फायदेशीर ठरल्याचे मत भाजपमधील एक गट व्यक्त करीत आहे. ते भाजपचे आहेत की, शिवसेनेचे हे कळण्यास मार्ग नसल्याची खंत काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे.

दुसरीकडे पक्षातील सहा नगरसेवकांना आजवर कुठल्याही पदावर संधी मिळालेली नाही. पुढच्या वर्षी स्थायी समितीमध्ये त्यातील दोन जण जातील. चौघांपैकी सभापतीपदी एकाची वर्णी लागेल. त्यामुळे एकाला उपमहापौर केल्यास समान संधी दिल्याचा संदेश जाईल. सर्व नगरसेवकांमध्ये समाधानाची भावना राहील. त्यामुळे उपमहापौर औताडे यांना सव्वा वर्ष कार्यरत ठेवावे व ज्यांना आजवर काहीही संधी मिळाली नाही, अशांपैकी एका नगरसेवकाला उर्वरित सव्वा वर्षाचा कालखंड द्यावा, अशी मागणी वरिष्ठांकडे लावून धरण्यात येत आहे. 

सगळे निर्णय वरिष्ठांच्या हातीभविष्यात शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण कसे राहील, हे सांगता येणे अवघड आहे. त्यामुळे पालिकेत पक्षाची भूमिका आणि धोरणे लावून धरणाऱ्या व्यक्तींना वैधानिक पदांवर बसविण्याबाबत वरिष्ठ नेते विचार करू लागले आहेत. त्याआधारेच औताडेंना सव्वा वर्षानंतर बदलण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. 

प्रवक्ते बोराळकर म्हणाले...भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, सव्वा वर्ष उपमहापौरपद वाटून घेण्याबाबत चर्चा झाली होती. सध्या तशी काही मागणी सुरू झाली असेल तर वरिष्ठांच्या निर्णयानुसारच यापुढे निर्णय होईल.

कोअर कमिटीतही झाली होती चर्चाभाजप कोअर कमिटीतही सव्वा वर्ष उपमहापौरपद देण्याबाबत चर्चा झाली होती. नगरसेवक नितीन चित्ते, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांची नावे पुढे आली होती. पण ऐनवेळी औताडे यांचे नाव पुढे आले. सव्वा वर्ष उपमहापौरपद एकेकाला देऊन सर्वांना समान न्याय देण्याबाबत कोअर कमिटीचे सर्व सदस्य अजूनही ठाम आहेत. औताडे सध्या शिवसेनेच्या मांडीवर बसल्यासारखे वागू लागल्यामुळे सव्वा वर्षच त्यांना या पदावर ठेवण्याबाबतच्या चर्चेने जोर धरला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा