शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लग्नानंतर आई बेपत्ता; १४ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्षे केले अत्याचार

By सुमित डोळे | Updated: November 24, 2023 14:15 IST

सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने प्रकरण ठाण्यात- मुलीने दिली तक्रार

छत्रपती संभाजीनगर : आईने दुसरे आंतरधर्मीय लग्न केल्यानंतर तिच्या पहिल्या १४ वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी दोन वर्षे अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली . विशेष म्हणजे, पीडित मुलीची आई दोन वर्षांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. त्यानंतर सावत्र वडिलांनी मुलीला घरात विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून मोबाईलमध्ये अश्लाघ्य व्हिडीओ रेकॉर्ड करणे सुरू केले. वडिलांच्या छळाला कंटाळून अखेर मुलीने घर सोडले व सामाजिक संघटनेच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. गुरुवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी वडिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडिता दोन वर्षांची असताना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा आंतरधर्मीय विवाह केला. मात्र, त्याने आईचा छळ सुरू केला. त्यांच्यात रोज वाद सुरू झाले. एक दिवस सर्व भावंडे बाहेर असताना आईने तिला कॉल करून तातडीने घरी बोलावले. ती घरी गेली तेव्हा फक्त सावत्र वडील घरात होता. त्याच्या मानेभोवती ओरखडे होते. तसेच घरात काचेचे तुकडे पडलेले होते. मात्र, आई घरात नव्हती. शेजारच्यांनी पीडितेला आई जखमी अवस्थेत पळत होती व वडील तिच्या मागे पळत गेला, एवढेच सांगितले. त्यानंतर आठ दिवस वडील पीडितेसह अन्य मुलांना घेऊन मुंबईला चालल्या गेला.

मग वडिलांची वृत्ती बदललीआठ दिवस मुंबईत राहून तो मुलांना घेऊन पुन्हा पुंडलिकनगर परिसरात राहण्यास आला. त्यानंतर मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत होता. तिच्या लग्नाचा प्रयत्नही सुरू केले. अनेकदा बळजबरीने काही पदार्थ खायला देणे सुरू केले. २३ ऑक्टोबर रोजी अखेर मुलीने घर सोडून मैत्रिणीचे घर गाठले. संघटनांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेतली. महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवून रात्री यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद