शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

औरंगाबादेत सकाळी बैठक, सायंकाळी कारवाईचे नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:38 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाल्यांचा भयंकर त्रास वाढला असून, आम्हाला दुकानांचे शटरही उघडणे अवघड झाले आहे. रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-या मंडळींवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आज त्रस्त व्यापाºयांनी महापालिकेला दिला.

ठळक मुद्देहातगाड्यांचा विळखा : फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा व्यापाऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाडीचालक, फेरीवाल्यांचा भयंकर त्रास वाढला असून, आम्हाला दुकानांचे शटरही उघडणे अवघड झाले आहे. रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-या मंडळींवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आज त्रस्त व्यापाºयांनी महापालिकेला दिला. व्यापा-यांचे हे रौद्र रूप पाहून महापालिका प्रशासन त्वरित कामालाही लागले. सायंकाळी पाच वाजेपासून शहागंज परिसरापासून हातगाड्या, अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईच्या दुसºयाच दिवशी चित्र जशास तसे पाहायला मिळते, हे विशेष.शहागंज, सिटीचौक, रंगारगल्ली, गुलमंडी, टिळकपथ, गोमटेश मार्केट, औरंगपुरा, कुंभारवाडा, चेलीपुरा, पैठणगेट आदी भागांत सर्वाधिक हातगाड्या आहेत. प्रत्येक दुकानासमोर एक तर हातगाडी हमखास असतेच; कितीही हाकलून लावल्यानंतर हातगाडीचालक परत येऊन उभे राहतात. त्यांच्यामुळे आम्हाला व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. जुन्या शहरातील रस्ते रुंद केले. या रुंद रस्त्यांवर हातगाडीचालक आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. महापालिका या संकटातून व्यापाºयांना बाहेर काढणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू,असा इशाराही व्यापाºयांनी मनपाला दिला. सकाळीच व्यापाºयांचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी केले. यावेळी नगरसेविका यशश्री बाखरिया, शिल्पाराणी वाडकर, नासेर सिद्दीकी, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, हेमंत कदम यांच्यासह उपायुक्त रवींद्र निकम उपस्थित होते. शहागंज ते सिटीचौकपर्यंत एकही हातगाडी दिसता कामा नये, असे आदेश महापौरांनी यावेळी .एमआयएमचे राजकारणशहागंज चमनमध्ये जवळपास १०० टपºया आहेत. या टप-यांचीही लीज संपली आहे. या टप-या काढण्याचे आदेश मालमत्ता विभागाला देण्यात आले होते.मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांनी सर्व टपरीधारकांना सामान रिकामे करा, असे आदेश दिले. त्याच वेळी विरोधी पक्षनेते फेरोज खान तेथे पोहोचले. त्यांनी एकही टपरी काढू देणार नाही, अशी भूमिका घेतली. शहागंजमधील सर्व दुकानांची पार्किंग गायब आहे.अगोदर ही पार्किंग शोधा असे त्यांनी नमूद करीत कारवाईला वेगळे वळण दिले. मनपाने टपरीधारकांकडून २०१८ मध्ये भाडे भरून घेतले. न्यायालयाचा आदेश आहे, अशी भूमिकाही टपरीचालकांनी मांडली.शहागंजपासून कारवाईमहापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सायंकाळी ५ वाजेपासून शहागंज परिसरापासूनच कारवाईला सुरुवात केली. शहागंज चमनजवळ किमान १५० पेक्षा अधिक हातगाड्या होत्या. मनपाचे पथक पाहून सर्व हातगाड्या क्षणार्धात पसार झाल्या. एकही हातगाडी मनपा पथकाच्या हाती लागली नाही. अतिक्रमण हटाव पथकाने सिटीचौकपर्यंत कारवाई केली. सिटीचौकात रात्री कारवाईला पूर्णविराम देण्यात आला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका