शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सॉप्टवेअरचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात २३९९ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST

ऑडिटनंतर प्रशासनाला जाग, ४६४ जणांकडून वसूल केले ३९ लाख; २ हजार लाभार्थ्यांची साधली चुप्पी

- प्रवीण जंजाळकन्नड : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत २०२२-२३ मध्ये महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली असून, आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे जमा केले असून, १ हजार ९३१ शेतकऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत अनुदान परतीकडे दुर्लक्ष केले आहे.

राज्य शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या निकषानुसार अनुदान देण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या वर्षात शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान दिले होते. सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर शेतकऱ्यांनी उचलून खर्चही केली. याबाबत केलेल्या लेखा परीक्षणात जिल्ह्यातील २ हजार ३९९ शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या. तसेच ज्या बँकेतून संबंधित शेतकऱ्यांना अधिकचे पैसे दिले त्या बँकांनाही पत्र देण्यात आले. त्यानंतर ४६४ शेतकऱ्यांनी ३९ लाख २७ हजार ८३१ रुपये शासनाकडे युपीआय व आरटीजीएसद्वारे जमा केले. १ हजार ९३१ शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी पैसे परत करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करावेत तरी कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

३१२ शेतकऱ्यांकडून अधिकची वसुलीदरम्यान, जिल्ह्यातील ३१२ शेतकऱ्यांकडून अधिकचे अनुदान वसूल करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडून महसूल विभाग आणि बँका या दोन्ही यंत्रणांनी पैसे वसूल केले. आता हे शेतकरी एक रक्कम परत मागण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.

कन्नड तालुक्यात सर्वाधिक वसुलीकन्नड तालुक्यात सन २०२२-२३मध्ये ६७ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतील पीक नुकसानीचे अनुदान प्राप्त झाले होते. यापैकी ६१६ शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा पीक नुकसानीचे अनुदान वाटप झाले होते. त्यापैकी ३१२ शेतकऱ्यांकडून २४ लाख २० हजार ७६२ रुपये वसूल करण्यात आले असून, हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

दोन वेळा अनुदान घेतलेले जिल्ह्यातील शेतकरी असेकन्नड तालुका- ६१६ पैकी ३१२ शेतकऱ्यांनी २४ लाख २० हजार ७६२ रुपये शासनाकडे जमा केलेगंगापूर - ७पैकी ३ शेतकऱ्यांनी १७ हजार ८५० रुपये जमा केलेपैठण - १८पैकी एकाही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.फुलंब्री - २०पैकी १४ शेतकऱ्यांनी ८३ हजार ४८७ रुपये परत केले.सिल्लोड - ६१०पैकी १३५ शेतकऱ्यांनी १४ लाख ५७ हजार ६१४ रुपये जमा केले.सोयगाव- ५३पैकी ४ शेतकऱ्यांनी १० हजार ३३६ रुपये परत केले.वैजापूर - ७९०पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.छत्रपती संभाजीनगर - २८५पैकी एकानेही शेतकऱ्याने पैसे परत केले नाहीत.खुलताबाद तालुक्यात एकाही शेतकऱ्याला अधिकचे अनुदान मिळाले नाही.

रक्कम परत घेतलीसॉप्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एक पेक्षा अधिक वेळा रक्कम गेली होती. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने ९० टक्केंच्यावर रक्कम शासन खात्यात जमा झाली आहे.- विद्याचरण कडवकर, तहसीलदार, कन्नड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रbankबँक