शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हज कमिटी चेअरमनपदाचे आमिष देऊन बिल्डरची पन्नास लाखांहून अधिकची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:43 IST

मुख्य दोन सूत्रधारांना पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीत तळ ठोकून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देहज कमिटी चेअरमनपदाचे आमिष प्रकरण आरोपींना पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीत तळ ठोकूनआरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

औरंगाबाद : हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देण्याच्या नावाखाली बिल्डरची झालेली फसवणूक ५० लाखांहून अधिक असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बिल्डरांकडून पैसे उकळणाऱ्या या फसवणूक प्रकरणातील मुख्य दोन सूत्रधारांना पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीत तळ ठोकून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जयसिंगपुरा येथील बिल्डर मोहंमद आरेफोद्दीन यांना हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने खालेद राहगीब (रा. नवी दिल्ली), परवेज आलम (रा. शाहीन बाग, ओकला, नवी दिल्ली) आणि आबुसाद (रा. मुंबई) यांच्याविरोधात बेगमपुरा ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंदविला. बिल्डर आरेफोद्दीन यांना त्यांच्या व्यवसायाची दूरदर्शनवर जाहिरात करायची असल्याने त्यांच्या मित्रांमार्फत खालेद राहगीब आणि परवेज आलम यांच्याशी ओळख झाली होती. 

बिल्डर आरेफोद्दीन यांच्याकडे मुबलक पैसा असल्याचे त्यांना समजताच त्यांनी त्यांना हज कमिटीचे चेअरमनपद मिळवून देतो, असे आमिष दाखविले. परवेज आलम आणि खालेद यांनी दोन टप्प्यात ३३ लाख बिल्डरकडून उकळल्याची प्राथमिक माहिती अहवालात नमूद केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना ही फसवणूक केवळ ३३ लाखांपुरती मर्यादित नसल्याचे समोर आले. परवेज आलम आणि खालेद राहगीब आणि आबुसाद यांच्याशिवाय अन्य लोकांचा यात समावेश असल्याचे समोर आले. त्यांनी आरेफोद्दीन यांना वेगवेगळी कारणे सांगून ५० लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे फसवणूक करताना त्यांनी  रक्कम घेतली. 

धनादेशाद्वारे घेतले ७० हजारटोळीने ५० लाखांहून अधिक रकमेची आरेफोद्दीन यांची फसवणूक केली. या रकमेपैकी  केवळ ७० हजार रुपये त्यांनी धनादेशाच्या स्वरुपात घेतले होते. उर्वरित सर्व रक्कम रोख स्वरुपात घेतल्याचे तपासात समोर आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे आरेफोद्दीन यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून परवेज आलम आणि खालेद यांना दिली. 

पथक दिल्लीत तळ ठोकूनपरवेज आलम आणि खालेद यांना पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक  दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला गेले. खालेद हा दूरदर्शनमध्ये कार्यरत  आहे. असे असले तरी  दोन्ही आरोपींसह मुंबईतील आबुसादसह अन्य आरोपी पसार झालेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस