शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

राज्यातील बारमाही नद्यांकाठीच ‘ताम्रपाषाण’ युगातील २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:20 IST

‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली. 

औरंगाबाद : ज्या नद्यांना बारमाही पाण्याचा साठा उपलब्ध आहे. अशा नद्यांकाठीच ताम्र पाषाण युगात वसाहती वसल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जी. के. माने यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागाच्या वस्तुसंग्रहालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डॉ. आर. एस. गुप्ते व्याख्यानमालेला गुरुवारी सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यात ‘महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन संस्कृती’या विषयावर डॉ. माने यांनी मांडणी केली. 

ते म्हणाले, गोदावरी नदी ही महाराष्ट्राची जननी आहे. या नदीच्या  खोऱ्यातच संस्कृतीचा जन्म झाला. राज्यात ताम्रपाषाणकालीन संस्कृतीच्या २२५ पेक्षा अधिक लोकवसाहती उजेडात आल्या आहेत. त्यापैकी नगर जिल्ह्यातील दायमाबाद ही खऱ्या अर्थाने  ताम्रपाषाणयुगाची सर्वसमावेशक अशी वसाहत आहे़  या संस्कृतीच्या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे, ज्याठिकाणी नद्यांना बारमाही पाण्याचा साठा आहे आणि लगतच शेतीला उपयुक्त जमीन आहे. यातूनच वसाहतींचा विकास होत गेला. तापी, गिरणा, भीमा, कृष्णा, निरा, कऱ्हा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात ही संस्कृती अधिक वाढली. या वसाहतीचा १९५० साली जोव येथे शोध लागला. त्यानंतर नेवासे, प्रकाशे, बहाळ, सोनेगाव, आपेगाव, दायमाबाद, इनामगाव, वाकढी, कवठे, रंजाळे, तुळजापूर गढी, आडम, तारसा याठिकाणी उत्खनन करून ताम्रपाषाण संस्कृतीचे महाराष्ट्रातील स्थान निश्चित करता आल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. इतिहास विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  डॉ. गीतांजली बोराडे,  कुमार भवर, डॉ. अमोल कुलकर्णी, प्रा.संजय पाईकराव, सुधीर बलखंडे, मच्छिंद्र चौधरी, प्रबुद्ध म्हस्के, सोनाली म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणriverनदीMaharashtraमहाराष्ट्र