शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मोर्चा, आंदोलनाचा सोमवार

By admin | Published: August 12, 2014 12:59 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, आदिवासी पारधी समाज परिवर्तन परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मानवी हक्क अभियानच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, आदिवासी पारधी समाज परिवर्तन परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मानवी हक्क अभियानच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात आले़ तर मनसेने विविध मागण्यांसाठी नळदुर्ग नगर पालिकेवर मोर्चा काढला़ वाशी येथे धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये मेंढ्याही सहभागी करण्यात आल्या होत्या.आदीवासी पारधी समाज परिवर्तन परिषदेच्या वतीने शहरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात अध्यक्ष पंडित भोसले, कार्याध्यक्ष अनिल काळे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते़ मानवी हक्क अभियानच्या वतीने गायरान जमीन नावे करावी, या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी अध्यक्ष बजरंग ताटे, सचिव माया शिंदे, दादाराव कांबळे, सुरेश कांबळे, ताराबाई कसबे, सुमन काळे, वाल्मिक सगट यांची उपस्थिती होती़ उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या कर्जदारांवर गुन्हे दाखल करून कर्जवसुली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे़ या उपोषणात जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, जिल्हा सचिव संजय यादव, बाळासाहेब कोठावळे, नाना पडघम, सुजित साळुंके, आबा ढवळे, प्रदीप सुर्यवंशी, हेमंत पाठक आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत़ तर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या उपोषण आंदोलनात सरचिटणीस प्ऱए़वानखेडेकर यांच्यासह एस़ एम़ तोटावार, डी़आऱजाधव, जी़व्ही़सस्ते, जी़व्ही़वडणे आदी सहभागी झाले आहेत़ नळदुर्ग येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, एसक़े़जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला़ यावेळी शासनाचा निधी व लोकवाटा घेवून नगर पालिकेने घरकूल योजना पूर्ण केलेली नाही, प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे, हे प्रकार थांबवावेत जोरदार मागणी एस़ के़ जहागिरदार यांनी यावेळी केली़ मोर्चात जिल्हा सचिव अमरराजे कदम, शहराध्यक्ष ज्योतीबा येडगे, बशीर शेख, रमेश घोडके, आलीम शेख, दत्तात्रय धारवाडकर, गौस कुरेशी, अरूण जाधव, तानाजी खलाटे, निलेश मुळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते़राज्यातील धनगर समाजाला महाराष्ट्र शाससनाने अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने वाशी येथील पारा चौकातून सवाद्य मोर्चा काढून तो शिवाजीनगर, लक्ष्मीरोड मार्गे तहसील कार्यालयावार नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळणही केली. मोर्चात माजी सरपंच दिलीप लगास, विजयसिंह तागडे, विक्रम पितळे,तुळशीदास करडे, अ‍ॅड.हनुमंत भोंडवे, उमेश खडके, अमोल केळे, वैजिनाथ वैद्य, प्रकाश कोरडे, समाधान ढेंगाणे, प्रभाकर सलगर, बापू केळे, शंकर केळे, मंगेश शिंपले, तानाजी पाटील, मंगल पितळे, पं.स.सदस्य अरूणा करडे, कावेरी लगास यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. दरम्यान, याच मागणीसाठी लोहारा तालुक्यातील अचलेर येथेही मोर्चा काढण्यात आला. यात दुशाकांत राघोजी, सुनील मदने, हिराकांत सोलंकर, विजय रूपनूर, मारूती जामगे, शिवा जामगे, अनिल सोलंकर, सुनील ठेंगील आदी सहभागी झाले होते. (ठिकठिकाणचे वार्ताहर)