शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहीणींच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया तीन दिवसांत सुरू होणार: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:58 IST

काही अंतरावरच शिवसेनेच्या तीन गटांनी तीन ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने अंतर्गत वाद उघडपणे दिसून आले. 

फुलंब्री : लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या तीननंतर पंधराशे रुपये टाकण्याची प्रक्रिया सुरुवात होणार असल्याची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बहिणींना शुभेच्छा दिल्या. माहिती दिली ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाल फाटा येथे काहीकाळ थांबले होते. दरम्यान, काही अंतरावरच शिवसेनेच्या तीन गटांनी तीन ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने अंतर्गत वाद उघडपणे दिसून आले. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरहून बायकार फुलंब्री मार्ग सिल्लोड येथे महिला सशक्तीकरण योजनेच्या शुभारंभ करिता निघाले. दुपारी जळगाव महामार्गाने जात असताना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाल फाटा येथे काहीकाळ थांबले होते. यावेळी माजी सभापती किशोर बलांडे यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. येथे मोठ्या प्रमाणात महिला हजर होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रथम लाडक्या बहिणींना माझ्या शुभेच्छा. येत्या तीन दिवसांपासून त्यांच्या खात्यावर १५०० रुपये टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच लाडका भाऊ योजनाही लवकर अंमलात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, आदर्श पथसंस्थेमध्ये पैसे अडकलेल्या जातेगाव येथील शेकडो नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले. या संदर्भात माझी मिटिंग झालेली आहे त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

शिवसेनेच्या तीन गटाकडून तीन  ठिकाणी सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव महामार्गावरून सिल्लोड ला जात असताना पाल फाटा येथे केवळ दीडशे फुटाच्या अंतरावर दोन गटांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार आयोजित केला. पाल गावात जाणाऱ्या रस्त्यावर माजी सभापती चंद्रकांत जाधव यांच्यावतीने सत्कार करण्यात आला तर दुसरा सत्कार माजी सभापती किशोर बलांडे यांच्यावतीने काही अंतरावर करण्यात आला. त्यानंतर फुलंब्री टी पॉइंटवर शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे ,जमीर पठान ,राउफ कुरेशी यांनी वेगळा सत्कार केला. विशेष म्हणजे, या तिन्ही सत्कारप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. आतापर्यंत अंतर्गत सुरु असलेला बेबनाव या कार्यक्रमातून सर्वाना दिसून आल्याची चर्चा यावेळी झाली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद