शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'मोदीजी, महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी निर्णय घ्या'; तरुणाईचे प्रधानमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 18:05 IST

देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे

औरंगाबाद : हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे अशा मागणीचे पत्र थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

या पत्रातील मजकुराचा सारांश असा : मा. प्रधानमंत्री, स्वातंत्र्य मिळून आता ७३ वर्ष झाले असून आपण विविध क्षेत्रात आमुलाग्र प्रगती केली आहे. मात्र, आजही देशात महिलांसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करू शकलो नाही. हैद्राबाद येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर जनतेच्या मनात तीव्र राग आहे. प्रत्येकजण तुम्ही यावर काय बोलणार याची वाट पाहत आहे. आपण तरुणांना उद्याचे भविष्य असे म्हटले आहे. हिच तरुणाई आपल्याला विनंती करत आहे की, अशा गुन्ह्यात कडक कायद्याची अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. आम्ही आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.  

तरुणांच्या प्रतिक्रिया :

स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला समाजातील पितृसत्ताक मानसिकता संपुष्टात आणली तरच अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांना आळ बसेल. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तरच त्या सुरक्षित राहतील. हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी.  - महिमा सांबरे

कठोर शिक्षा व्हावी न्यायालयाने त्या नराधमांना कठोर शिक्षा करावी. जेणे करून अशा हिंसक कृत्यांना आळा बसेल.- अक्षय दराडे

कायद्यात कालानुरूप बदल करावेत सरकारने वेळोवेळी स्त्रियांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन कायद्यात काळानुसार बदल करावा. ही मागणी पत्राद्वारे प्रधानमंत्र्यांना करत आहोत. हैद्राबाद येथील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी.       - आशिष जावळे

विशेष न्यायालय स्थापन करा

प्रियंका रेड्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारच्या घटना रोखण्यासाठी कायदा आणखी कठोर करत तात्काळ शिक्षा सुनावण्याची तरतुद करण्याची गरज आहे. त्याच बरोबर जिल्हा व तालुका पातळीवर बलात्काराच्या खटल्यांची तातडीने सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे.    - मनीषा भ. घायवट

कठोर शासन करावे आरोपींना कठोर शासन करावे, जेणेकरून यापुढे कोणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. - सिंथिया व्हीगेट

केसचा तत्काळ निकाल लावा तुम्ही एका रात्रीत सरकार बनवू शकता मग एका दिवसात बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देणारा कायदा का करू शकत नाही ? विरोधकांनी देखील 70 वर्षे जुन्या घटनेवर न बोलता या बद्दल सरकारला घेरले पाहिजे.- नवनीतकुमार तापडिया

टॅग्स :prime ministerपंतप्रधानWomenमहिलाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद