शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

सिल्लोड महोत्सवाच्या नावाने लिंक पाठवून १०० जणांचे मोबाइल हॅक, यूपीआयद्वारे लाखों लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 19:11 IST

सायबर भामट्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या कालावधीत या महोत्सवाच्या नावाने लिंक तयार केल्या

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : शहरात झालेल्या सिल्लोड महोत्सवाच्या नावाने लिंक पाठवून १०० जणांचे मोबाइल हॅक केल्याचे प्रकार घडले असून, या माध्यमातून लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडूनही तक्रार घेतली जात नसल्याने तेही हतबल झाल्याचे दिसत आहे.

सिल्लोड येथे १ ते १७ जानेवारी यादरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लावण्या, कव्वाली, ऑर्केस्ट्रा, नामवंत गायकांचे शो आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम फेसबुक, यू-ट्युबवर लाइव्ह करण्यात आले होते. याबाबतची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, यासाठी या कार्यक्रमांच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या होत्या. याचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या कालावधीत या महोत्सवाच्या नावाने लिंक तयार केल्या. त्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या. सदरील लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधितांचे मोबाइल हॅक होऊ लागले. 

मोबाइल हॅक झाल्यानंतर सदरील मोबाइलमधील कॉन्टॅक्ट नंबरवर व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधला जायचा. त्यावर समोरील व्यक्तीकडे १ हजार, २ हजार रुपये अर्जंट हवे आहेत, असे सांगून पैशाची मागणी केली जात होती. ओळखीतील व्यक्तीचा मोबाइल नंबर आल्याने समोरील व्यक्तीही अडचण असेल असे समजून पैसे पाठवित होते. पाठविलेले पैसे हॅकर आपल्या खात्यात वळते करून घेत असत. शिवाय, हॅकर गुगल पे, फोन पे आदी ॲपच्या माध्यमातून पैसे काढून घेत होते. याद्वारे तासाभरातच अनेकांच्या बँक खात्यावर या सायबर भामट्यांनी डल्ला मारला. अशा घटना घडत असल्यानंतर अनेकांनी लगेच बँकेला संपर्क करून फोन पे, गुगल पे बंद केले. बँकेला सांगून अकाउंट बंद केले आणि मोबाइलला सॉफ्टवेअर मारले. त्यानंतर हा प्रकार बंद झाला. याचा फटका अनेक व्यापारी, सिल्लोड महोत्सवाशी संबंधित अधिकारी, राजकीय नेते, पत्रकार आदी दिग्गज व्यक्तींना बसला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेक नागरिक गेले; परंतु असे गुन्हे उघड होत नाहीत, हॅकर्स काही तासांत सिम बंद करतात, तक्रार करून फायदा नाही, असे सांगून तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत असल्याने संबंधितांचा नाईलाज झाला.

मित्रांनी पाठविलेली रक्कम खात्यात आलीच नाहीमला सिल्लोड महोत्सवाची लिंक आपणास आली होती. सदरील लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर माझा मोबाइल हॅक झाला. त्यानंतर माझ्या नावाने माझ्या १० मित्रांकडे पैशाची मागणी करण्यात आली. मित्रांनी एकूण १० हजार रुपये पाठविले. याबाबत मित्रांमार्फत माहिती मिळाल्यानंतर माझे बँक खाते तपासले असता, खात्यात रक्कम आली नाही. हॅकरने परस्पर ती आपल्या खात्यात वळती करून घेतली.- साहील खान (नाव बदललेले आहे.) नागरिक, सिल्लोड.

तक्रार करून काहीच फायदा नाहीजिल्ह्यात एकूण ४७० जणांनी विविध घटनेत अशीच फसवणूक झाल्याची सायबर क्राइमकडे तक्रार दिली आहे. वर्ष उलटले तरी गुन्हे उघड झाले नाहीत. तक्रार करून काहीच फायदा होत नाही. हॅकर्स सिम तोडून फेकून देतात. याला सतर्कता हाच एकमेव पर्याय आहे. कुणी कुणाला पैसे पाठविण्यापूर्वी संपर्क करावा व फसवणूक टाळावी, हाच पर्याय आहे.-शेषराव उदार, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शहर.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद