शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, बाळा नांदगावकरांचे मागील दोन महिन्यात तीन दौरे 

By बापू सोळुंके | Updated: October 28, 2023 22:44 IST

MNS News: सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.  मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील  दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत.

- बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर - सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.  मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील  दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत. मागील दौऱ्यात दिलेल्या कृती कार्यक्रमाचा आढावा त्यांनी आज संपलेल्या त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात घेतला. सोबतच त्यांनी    त्यांनी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल जैन समाज आणि माहेश्वरी समाजाच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. 

लोकसभा निवडणुक अवघ्या सहा महिन्यावर आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार उभे न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येते आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर हे २६ ऑक्टोबर रोजी शहराच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते.  पंधरा दिवसापूर्वी   पक्षातर्फे गणपती आणि नवरात्र या सणांच्या कालावधीत पदाधिकाऱ्यांसाठी दिलेल्या कृती कार्यक्रम आणि उपक्रमाची माहिती घेतली.

काल २७ रोजी सकाळी मनसे विद्यार्थी सेनेच्या  विधानसभा निहाय बैठका सुभेदारी विश्रामगृह येथे  घेतल्या.  महाविद्यालयीन तरुणांची मतदार नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या बैठकीत पुढील वीस दिवसाचा कृती कार्यक्रम दिला.  मारवाडी समाज,  सिंधी समाज,  माहेश्वरी समाज, ब्राम्हण समाज,  राजस्थानी आदी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत   जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर ,राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी,दिलीप चितलांगे,वैभव मिटकर ,दिलीप बनकर पाटील, राजीव जावळीकर, अनिकेत निलावार, प्रशांत जोशी अशिष सुरडकर, सतीश सोळुंके आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसे