शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; अमेय खोपकर संतापले, जलील यांच्यावर कारवाईची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:04 IST

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.

मुंबई/औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. (Lockdown in Aurangabad cancelled by District administration)

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार  इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. याचपार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

दरम्यान, आधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलMNSमनसेAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस