शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:13 IST

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे.

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे. राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. मात्र यानंतरही राज ठाकरेंची सभा होणारच असं विधान, मनसेचे औरंगाबादचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केलं आहे. 

आज बुधवार २० एप्रिल रोजी औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्राम गृह इथे मनसेची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर सुमित खांबेकर म्हणाले की, कोणी कितीही विरोध असला तरी राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा शंभर टक्के होणार आणि तीही पूर्ण ताकदीने होणार आहे. तसेच पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही, तरीदेखील सभा ही होणारच आणि ठरलेल्या ठिकाणी, असा इशारा देखील सुमित खांबेकर यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन राज ठाकरेंच्या सभेला परवानी देणार की नाही, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

आम्ही प्रशासनाच्या विविध परवानग्या घेतल्या आहेत. तसेच आता पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. पोलीसही लवकरच सभेसाठी परवानगी देणार असल्याची माहिती सुमित खांबेकर यांनी यावेळी दिली. राज ठाकरे यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील विविध भागात महाआरतीचेही आयोजन करण्यात आले, असून आम्ही लवकरच औरंगाबाद शहरातील विविध भागामध्ये जाऊन महाआरती घेणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला विविध हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा दिला असल्याची माहितीही सुमित खांबेकर यांनी दिली. 

औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील- गृहमंत्री वळसे पाटील

राज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद