शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 7:40 PM

सर्व ताकदीच्या व्याख्येत तिथीनुसार शिवजयंती करण्याची संधी मनसेने साधली.

ठळक मुद्देआमदारासह फौजफाटा असताना सेना पडली फिकीक्रांतीचौकावर मनसेचा ताबा 

 - विकास राऊत औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबाद काय ताकद आहे, असा प्रश्न विचारला किंवा पडला तर उत्तर एकच येईल, काहीही नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेत पक्षाची काहीही ताकद सध्या नाही. येथून मागे होती, नव्हती तो भाग वेगळा; परंतु सध्या तरी पक्षाकडे पक्षप्रमुख, नेते, पदाधिकाऱ्यांविना काहीही नाही. अशा सर्व ताकदीच्या व्याख्येत तिथीनुसार शिवजयंती करण्याची संधी मनसेने साधली. 

जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील सदस्यांसह पंचायत समिती, ग्रामपंचायतींमधील सत्ताकारणाचा टक्का पाहता तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे शक्तिप्रदर्शन करण्यात शिवसेना फिकी पडल्याचे जाणवले. तारीख आणि तिथी हा शिवजयंतीचा मुद्दा शिवसेनेनेच आजवर चालू ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ताधीश म्हणून गुरुवारी जल्लोषाचा धुराळा उडविण्याची शिवसैनिकांना अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा कुठेतरी ‘कोरोना’च्या आड दडल्याचे दिसले. गर्दी जमा होणार नाही, शक्तिप्रदर्शन होणार नाही. पोलीस परवानगी मिळणार नाही, अशा काही बाबींवर बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांनी खाजगीत चर्चा केली. पक्षादेशही पाळायचा आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट समाजाचे मनही दुखवणार नाही, याची काळजी घेत शिवसेनेने कोरोना व्हायरसमुळे मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्याचे ठरविले. त्यातच काही आमदार मुंबईला निघून गेले. या सगळ्या कारणांमुळे वॉर्डनिहाय शिवपूजन आटोपून शिवसैनिकांनी जयंती साजरी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. क्रांतीचौकात मनसे आणि शिवसेना यांचे व्यासपीठ आमने-सामने लागले. दोन्ही व्यासपीठांकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा वळत होत्या. कुणाकडे किती जमलेत, हे नागरिकांच्या नजरेतून सुटले नाही. एरव्ही पोलीस परवानगीकडे लक्ष न देता कार्यक्रम करण्याची तयारी असणाऱ्या शिवसेनेने मात्र या तिथीला मागे पाऊल घेतल्याचे सर्वांच्या लक्षात आले.

क्रांतीचौकावर मनसेचा ताबा 

मुंबईतून येऊन मनसेप्रमुख राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौकात शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. आज ठाकरे यांच्याकडे जिल्ह्यातील (मोडक्या-तोडक्या) संघटनेपलीकडे काहीही नाही. असे असताना त्यांनी क्रांतीचौकावर ताबा घेतला. पूर्ण परिसरात राजमुद्रित ध्वजांची झालर होती, त्यामुळे शिवसेना झाकोळल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील सोडले तरी महापालिकेत शिवसेनेचे ३० च्या आसपास नगरसेवक आहेत, किमान त्यांनी तरी क्रांतीचौकात गर्दी करणे अपेक्षित होते; परंतु वॉर्डनिहाय शिवपूजनाच्या निमित्ताने तेदेखील क्रांतीचौकाकडे फिरकले नाहीत. मनसेची राजकीय ताकद पाहता त्यांना गर्दी जमविता आली, असे म्हणण्यापेक्षा त्यांनी शिवजयंतीची ‘तिथी’ साधली, असेच म्हणावे लागेल. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादShivjayantiशिवजयंती