शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदार पुत्रांचे राजू वैद्य यांच्याविरुद्ध बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास चार दिवसांपूर्वीच एकमुखी मंजुरी देणा-या स्थायी समितीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास चार दिवसांपूर्वीच एकमुखी मंजुरी देणा-या स्थायी समितीच्या १६ पैकी १३ सदस्यांनी सभापती राजू वैद्य यांच्या विरोधात सोमवारी बंडाचा झेंडा फडकावला. ३६ कोटी रुपयांचा मंजूर ठराव तूर्त सर्वसाधारण सभेकडे पाठवावा, अशी मागणी सदस्यांनी आयुक्तांकडे केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली. उल्लेखनीय बाब म्हणजे सभापतीही सेनेचे असून असंतुष्ट सदस्यांमध्ये सेनेच्याखासदार आणि आमदार पुत्रांचा समावेश आहे.वाळूज येथील मायोवेसल कंपनीने ३०० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम मिळविले. त्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागली. चार दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने तब्बल ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव समितीसमोर सादर केला. समितीनेही क्षणार्धात त्याला मंजुरी दिली. समितीमधील सर्वपक्षीय १३ सदस्यांनी सोमवारी अचानक आयुक्त, सभापती, नगरसचिव यांना एक पत्र दिले.या पत्रात म्हटलेय की, मायोवेसल कंपनीवर अनेक आरोप आहेत. अमरावती महापालिकेत कंपनीला ब्लॅकलिस्ट केले आहे. नांदेड, नाशिक येथे कंपनीने घनकच-यात आजपर्यंत नेमके कसे काम केले याची प्रत्यक्ष पाहणी करावी. तोपर्यंत मंजूर ठराव स्थगित ठेवावा. प्रशासनाची शहानिशा झाल्यावर हा ठराव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत पाठवावा.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न