शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदार, मंत्री शिवसेनेचा तरीही औरंगाबादमधील बायपासचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:33 IST

बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत.

- राम शिनगारे 

औरंगाबाद :  बीड बायपासला सर्व्हिस रोड, संग्रामनगर उड्डाणपूल, शिवाजीनगरचा भुयारी मार्ग नसल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सतत अपघात होत आहेत. नागरिकांचा यात नाहक बळी जात असून, शासकीय, राजकीय पातळीवर काहीही होत नाही. या भागाचे आमदार, खासदार, महापौर  शिवसेनेचे आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्रीपदही शिवसेनेकडेच आहे. तरीही हा प्रश्न सोडविण्यात सेना नेते अपयशी ठरले आहेत. नव्हे त्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

बीड बायपासवर सर्व्हिस रोड नाही. रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. राजकीय वरदहस्तामुळे ही अतिक्रमणे महापालिका तोडत नाही. यातच बीड, नागपूरकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्यामुळे सतत दुचाकीस्वारांचे अपघात होतात. मागील महिनाभरापासून तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. याशिवाय बीड बायपासवर सतत ट्रॅफिक जाम होत आहे. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. बीड बायपासचे रुंदीकरण, सर्व्हिस रस्ता, लिंक रस्ता आणि पैठण रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

सर्वच सत्तापदे शिवसेनेकडे असली तरीही हा प्रश्न सुटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच शिवसेना नेतृत्वाकडे नसल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. शुक्रवारी बायपासवर भीषण अपघात झाला. हा अपघात होताच शिवसेना आमदार संजय शिरसाट हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. तेव्हाच पोलीस यंत्रणाही दाखल झाली. पुन्हा एकदा वाहतुकींचे नियम पाळण्यासाठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच दिवशी परिस्थिती ‘जैसे थे’. बेशिस्त वाहतूक, अवजड वाहनांची गर्दी दिसून आली.

तिसऱ्या दिवसांपासून अवजड वाहतूक सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बंद करण्याचा निर्णय झाला. हा निर्णयही पहिल्याच दिवशी अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड बायपास रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे. हा रस्ता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याही मतदारसंघात येतो. त्यांनीही याकडे दुर्लक्षच केलेले आहे. शिवसेना नेते व खासदार चंद्रकांत खैरे यांचेही त्याकडे लक्ष नाही. आ.संजय शिरसाट यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळ, शासन दरबारी किती वेळा आवाज उठविला. हा संशोधनाचाच भाग आहे.

सातारा, देवळाई भागात दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यात शिवसेनेचे पानिपत झाले. तेव्हापासून शिवसेनेने या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. राजकीय कुरघोडीपायी सर्वसामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. आता काही दिवसांवर आलेल्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांना हा प्रश्न सोडविण्याचा पुळका येईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. मात्र त्यातून काहीही होणार नाही. हे आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून गृहीतच धरावे लागणार आहे.

१५० कोटीतून बायपासचे रुंदीकरण का नाहीराज्य सरकारने शहरातील रस्ते विकासासाठी १५० कोटी रुपये दिले आहेत. या पैशातून सातारा-देवळाईसह शिवाजीनगर, प्रतापनगर, मुस्तफाबाद, एमआयटी कॉलेज परिसर, रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांनाही या रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी १५० कोटीतून हा रस्ता का केला जात नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv Senaशिवसेना