शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या घाटीतून औषधी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:40 IST

गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून औषधी गायब झाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना रोज बसू लागला. घात-अपघात असो किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाºया रुग्णांना घाटीत दाखल होताच त्यांना औषधांची चिठ्ठी दिली जाते. महागडी औषधी खरेदी करून आणल्यानंतरच रुग्णांवर घाटीत उपचार सुरू होतात, या धक्कादायक प्रकारामुळे सामान्य रुग्ण मेटाकुटीस आले.

ठळक मुद्देनवीन आजार : बॅण्डेज, सलाईन, सिरिंज, सुई-दोराही बाहेरून आणावा लागतो

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून औषधी गायब झाल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना रोज बसू लागला. घात-अपघात असो किंवा प्रसूतीसाठी दाखल होणाºया रुग्णांना घाटीत दाखल होताच त्यांना औषधांची चिठ्ठी दिली जाते. महागडी औषधी खरेदी करून आणल्यानंतरच रुग्णांवर घाटीत उपचार सुरू होतात, या धक्कादायक प्रकारामुळे सामान्य रुग्ण मेटाकुटीस आले.मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख आहे. येथील निष्णात डॉक्टरांमुळे सामान्य मराठवाडा आणि शेजारील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात.मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाटीत दाखल होणाºया रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून घाटीतील जीवनावश्यक औषधी गायब झाली. घात-अपघातात जखमी झालेला रुग्ण दाखल होताच, बॅण्डेज, आय.व्ही. सलाईनसह अन्य औषधी तातडीने आणण्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते.जोपर्यंत रुग्णांकडून औषधी आणि डिस्पोजल साहित्य आणले जात नाही, तोपर्यंत डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होत नाही. असाच अनुभव प्रसूती विभागात प्रसूतीसाठी दाखल होणाºया गोरगरीब महिलांनाही येतो.प्रसूतीसाठी दाखल होणाºया महिलांच्या नातेवाईकांकडे तेथील डॉक्टर आणि नर्सेसकडून औषधांची चिठ्ठी सोपविली जाते. प्रसूती किट घेऊन या, असा सल्ला त्यांना दिला जातो. असाच अनुभव खुलताबाद येथील एका महिलेच्या नातेवाईकांना शुक्रवारी आला.घाटीतील आंतररुग्ण विभागातदाखल होतात रोज २०० रुग्णघाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज सुमारे १ हजार ७०० ते २ हजार रुग्ण येतात. यापैकी सरासरी २०० रुग्णांना आंतररुग्ण विभागात पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. त्याचप्रमाणे दररोज लहान-मोठ्या अशा सुमारे १०० शस्त्रक्रिया केल्या जातात. घाटीत रोज सरासरी ५० ते ६० महिलांची प्रसूती होते. यातील दहा ते पंधरा सिझेरियन असतात.औषधी आणा, नाही तर रुग्णाला घेऊन जाखुलताबादेत झोपडी करून राहणाºया दशरथ गणपत सोनवणे यांनी त्यांच्या सुनेला प्रसूती विभागात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या हातात औषधाची चिठ्ठी सोपवली.तेव्हा सोनवणे यांनी त्यांना तुमच्याकडे औषधी नाही का, असे विचारले असता. ते स्पष्ट शब्दांत नाही असे म्हणाले आणि आधी औषधी आणा, नाही तर तुमचा पेशंट घेऊन जा, असेही सुनावले.त्यानंतर सोनवणे आणि त्यांच्यासोबतच्या देवीसिंग चित्तोडिया यांनी मेडिकल स्टोअरमधून ५९० रुपयांची औषधी आणि डिस्पोजल साहित्य प्रसूती विभागात नेऊन दिल्याचे त्यांनी सांगितले.महत्त्वाची लिफ्ट बंदघाटी रुग्णालयातील अपघात विभाग आणि सर्जरी विभागाच्या इमारतीत तीन लिफ्ट आहेत. यापैकी वॉर्ड क्रमांक १५ जवळील लिफ्ट रात्री सुरू ठेवली जाते. तिसºया मजल्यावरील प्रसूती विभागात जाण्यासाठी जेव्हा गर्भवती महिला दाखल होतात तेव्हा त्यांना वॉर्ड क्रमांक १५ पर्यंत पायी जावे लागते. बºयाचदा लिफ्टपर्यंत पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती होते. ही बाब प्रशासनाला ज्ञात असूनही अपघात विभागाजवळील लिफ्ट सुरू केली जात नाही.

टॅग्स :medicineऔषधंAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य