शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकलेच्या आरशात समाज जीवनाचे प्रतिबिंब!

By admin | Updated: September 5, 2014 00:53 IST

जालना : गणेशोत्सव व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त बडीसडकवर चित्रकला प्रदर्शन सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हस्तकला लोप पावत चालली आहे.

जालना : गणेशोत्सव व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्या मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त बडीसडकवर चित्रकला प्रदर्शन सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हस्तकला लोप पावत चालली आहे. परंतु पारंपरिक ठेवा जोपासता यावा म्हणून ग्रामीण भागातील दहीपुरी येथील कलाशिक्षकाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन भरविले आहे. शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला कलाशिक्षक दिनेश ठाकूर हे ग्रामीण भागातील कलावंत घडविताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शाळेतील मुलांना पेन्सीलसुध्दा निट धरता येत नव्हती. कलेची जाण नव्हती. मी जेव्हा त्यांना एखादे चित्र काढण्यास सांगायचो तेव्हा विद्यार्थी माझ्यापासून दूर जात. प्रतिसाद देत नसे. सततच्या पाठपुराव्यानंतर आज दहीपुरी सारख्या छोट्या खेड्यातील विद्यार्थ्यांचे कला प्रदर्शन भरले, ही अभिमानाची बाब आहे. वेळप्रसंगी पदरमोड करुन मी त्यांना साहित्य पुरविले. आता प्रदर्शन भरवले व यातून सुध्दा चांगले कलाकार निवडून दोन वर्षांपासून जिल्हास्तरावर प्रदर्शन भरविण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करीत आहे. संस्था अध्यक्ष अमोल खरात यांनीही प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती, भौतिक परिस्थितीत विद्यार्थी काही फारसे करु शकत नाही किंवा शिक्षकही परिस्थितीमुळे हतबल असतात. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दहशतवाद, शेतकऱ्यांची आत्महत्या आदी विषयांवर शेकडो सुंदर चित्रे रेखाटली आहेत. ग्रामीण जीवनशैली तसेच काही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. थोडक्यात ग्रामीण भागातील प्रसंगचित्र चित्रित करुन जाती धर्मात सलोखा कसा निर्माण करता येईल याचे चित्रण केले आहे व शाहरी भागातील समाज जीवन कसे असते याचे वास्तविक चित्रण या कलेतून दिसून येते. ग्रामीण भागात राहणारे परंतू शहर व जागतिक प्रसंगाचे वर्णन चित्राच्या माध्यमातून केले. गणेशोत्सवानिमित्त सदरील प्रदर्शन विनामूल्य ठेवण्यात आले. सदरील प्रदर्शन मात्र त्यांना व त्यांच्या चित्रांना न्याय मिळण्याची गरज असल्याची अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली. सदरील चित्र रेखाटण व रंगकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे अविनाश खेडकर, सुमित टापरे, संदीप भोयटे, किशोर जाधव, विनोद खेडकर, अभिजित रांजणे, योगेश साळुंके, किशोर मोरे, गोपाल केसकर, गणेश रांजणे, दास निर्मळ, भगवानमुळे, अर्चना सपकाळ, निकीता सातपुते, योगेश मोरे, सचिन साळुंके, सोमनाथ गोडसे, मोनिका भोईटे, अश्विनी सपकाळ यांनी हे चित्र काढले आहे.