शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर भावाने केला अत्याचार; प्रसूतीदरम्यान विधवेचा बनाव उघडकीस आल्याने वाचा फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 11:50 IST

Crime News पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच कुटुंबात राहणाऱ्या ३३ वर्षीय भावाने अल्पवयीन बहिणीला जून २०२० मध्ये सुरुवातीला स्पर्श करीत विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

ठळक मुद्देसिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खासगी रुग्णालयात मुलीने दिला बाळाला जन्म

औरंगाबाद : सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १५ वर्ष ११ महिने वयाच्या अल्पवयीन बहिणीवर ३३ वर्षाच्या भावाने सहा महिने सतत अत्याचार केला. यातून बहिणीला दिवस गेले. सात महिने झाल्यानंतर बहिणीने भावाला प्रेग्नंट असल्याचे सांगितले. या अल्पवयीन पीडितेने २५ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. रुग्णालयाने मुलीचे आधारकार्ड मागितल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून भावाच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Brother raped minor sister in Aurangabad) 

सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच कुटुंबात राहणाऱ्या ३३ वर्षीय भावाने अल्पवयीन बहिणीला जून २०२० मध्ये सुरुवातीला स्पर्श करीत विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तेव्हा घरात कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अत्याचाराचा प्रकार सतत सुरू होता. यातून अल्पवयीन पीडितेला गर्भधारणा झाली. सात महिने झाल्यानंतर पीडितेने भावाला प्रेग्नंट असल्याचे सांगितले. यावरून भावाने पीडितेला बाळ माझे आहे हे, आई-वडिलांना सांगू नकोस, नाहीतर मारून टाकीन, अशी धमकी दिली. यानंतरही पीडितेने सर्व घटना आई-वडिलांना सांगितली. आई-वडिलांनी मुलीला प्रसूती होऊ दे, त्यानंतर तुझे लग्न करून देऊ, असे सांगितले. यानुसार मुलीला प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीने २५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आल्यामुळे मुलीचे खरे आधारकार्ड मागितले. त्याशिवाय रुग्णालयातून सुटी देणार नसल्याचे सांगितले. यावरून आधारकार्ड दिल्यानंतर मुलीचे वय १५ वर्ष ११ महिने असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा रुग्णालयाने १८ वर्षांखालील मुलीची प्रसूती झाल्याची माहिती एमएलसी सिटी चौक पोलिसांना पाठवून दिली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांना अल्पवयीन बाळंतिणीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात पाठविले. उपनिरीक्षक मुळे यांनी पीडितेला दोन तास विश्वासात घेऊन विचारले असता, बाळाचे वडील हा सख्खा भाऊच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडितेच्या जबाबावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

पतीचे निधन झाल्याचा बनावखासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करताना पीडितचे वय २३ वर्ष सांगण्यात आले. तसेच तिचे आधारकार्ड मागितले असता, तिच्या नवऱ्याचे निधन झाल्याची बतावणी पीडितेच्या कुटुंबाने केली. यानंतर डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या स्टोरी सांगितल्या. त्यामुळे संशय अधिक बळावला. त्यामुळे रुग्णालयाने जन्मदाखल्याचा पुरावा दिल्याशिवाय सोडणार नसल्याची तंबी दिल्यानंतर मुलीचे वय समोर आले. त्याची माहिती पोलिसांनी दिली. यावरून हा अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे.

अविवाहित भावाला ठोकल्या बेड्याअल्पवयीन बहिणीवर अत्याचार करणाऱ्या अविवाहित भावाला सिटी चौक पोलिसांनी रविवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसीखाक्या दाखविताच बहिणीवर अत्याचार केल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpregnant womanगर्भवती महिलाAurangabadऔरंगाबाद