शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा.

उस्मानाबाद : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १९ वयोगटातील २८ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, लोकमतने उस्मानाबाद शहरात केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बाल्यमन हरवत असल्याचेच यावरुन सिद्ध होते आहे. ‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. उस्मानाबाद शहरातील १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात सहभागी झालेल्यापैकी ४८ टक्के मुलांनी १० ते १३ या वयात मोबाईल आणि इंटरनेट वापरण्यास सुरवात केली. १३ ते १६ वर्षे वयोगटात इंटरनेट वापरण्यास सुरवात करणारांची संख्या २६ टक्के तर १६ ते १९ या वयोगटात मोबाईल आणि इंटरनेट वापरण्यास सुरवात केलेल्या मुलांची संख्या ३६ टक्के असल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४० टक्के मुले सोशल नेटवर्र्कींग साईटस्चा वापर करीत असल्याचेही दिसून आले. इंटरनेटचा वापर कशासाठी करता असा प्रश्न या मुलांना लोकमतने विचारला होता. २० टक्के तरुणांनी गाणे, गेम, व्हीडीओ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सांगितले. ३४ टक्के तरुण इंटरनेटच्या मदतीने शाळा, महाविद्यालयाच्या प्रोजेक्टसाठी वापर करीत असल्याचे दिसून आले. २६ टक्के मुलांनी केवळ वेबसाईट पाहण्यासाठी इंटरनेट वापरतो म्हणून सांगितले. तर २० टक्के मुलांनी इंटरनेटच्या माध्यमातून आपण चॅटींग करीत असल्याची कबुली दिली. चॅटींग करणाऱ्या या मुलांना आॅनलाईन चॅटींग कोणाशी करता असा सवाल केला असता, ६० टक्के मुलांनी ओळखीच्या मित्र-मैत्रिणीशी तर, ४० टक्के मुलांनी अनोळखी मित्र-मैत्रिणीशी चॅटींग करीत असल्याचे सांगितले. गुगलचा वापर सर्वाधिक‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करणारी किशोरवयीन बालकांची सर्वाधिक पसंती गुगल या वेबसाईटला असल्याचे सर्व्हेक्षणातून दिसून आले. ३६ टक्के मुलांनी गुगल वापरतो म्हणून सांगितले. २६ टक्के मुले फेसबुकला पसंती देत आहेत. ८ टक्के मुले इंटरनेवर युट्यूब मध्ये गुंतलेली असतात तर ४ टक्के मुलांनी ट्टिरचा वापर करीत असल्याचे सांगितले. उर्वरीत २६ टक्के मुलांनी इतर साईटस वापरत असल्याचे सांगितले.तज्ञ म्हणतात...सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैनी थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हाताळण्याची सक्ती करावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)इंटरनेट आॅडिक्शनमानसिक आजारात आता ‘इंटरनेट आॅडिक्शन’चा नव्याने समावेश झाला आहे. प्रौढांप्रमाणेच अल्पवयीन मुलेही इंटरनेटच्या अतिआहारी जात आहेत. यातून पोर्न व्हिडिओ पाहणे, ते पाठविणे, तसेच वेळ मिळेल तेव्हा चॅटिंग करणे, त्याशिवाय बेचैन होणे, अशी लक्षणे दिसून येतात. मोबाईलमुळे इंटरनेटचा वापर एवढा सोपा झाला आहे की, लहान मुलेही सहजपणे ते हातळत आहेत. इंटरनेटपासून रोखणे कठीण आहे. त्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव पालकांनी आपल्या पाल्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लैंगिक शिक्षण देणे आवश्यक झाले आहे. -डॉ. महेश कानडे, मानसोपचार तज्ज्ञपालकांनी तपासावा पाल्यांचा मोबाईल स्मार्ट फोन हातात नसला की, ही मुले अस्वस्थ होतात. टच स्क्रीन फोन तर त्यांना अधिक अधीर बनवत आहे. टॉयलेटमध्ये जातानाही स्मार्ट फोन सोबत घेऊन जातो, असे काही मुलांनी सांगितले. एवढा अतिरेक झाला आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे होत असलेले दुर्लक्ष हेच यास कारणीभूत ठरत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. स्मार्ट फोन घेऊन दिला तर इंटरनेटवर मुलगा काय करतो, यावरही जातीने सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून एकदातरी त्यांनी मुलांचा मोबाईल तपासावा. पालकाचे लक्ष असले तर धाकाने मुले अश्लील फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करून घेणार नाहीत.असे केले सर्वेक्षणलोकमतने उस्मानाबाद शहरातील १० ते १९ वर्षे वयोगटातील १०० शालेय मुला- मुलींशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेतली. त्यातून रँडम सॅम्पलिंग पद्धतीने सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आले. इंटरनेटचा वापर वाढलाइंटरनेटचा वापर आज सर्वसामान्य झाला आहे. पूर्वी सोय नसलेले अनेकजण इंटरनेटसाठी नेट कॅफे मध्ये जात होते. मात्र स्मार्ट फोनमुळे इंटरनेटची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात त्याच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. मोेठ्या प्रमाणेच इंटरनेट वापरणाऱ्यात किशोरवयीन बालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याअनुषंगाने या तरुणांना विचारले असता, इंटरनेटचा दररोज वापर करणाऱ्या तरुणांची संख्या २० टक्के होती. १८ टक्के तरुणांनी आठवड्यातून एकदा इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सांगितले. कधी-कधी वापर करतो असे सांगणारे १२ टक्के होते. तर ५० टक्के मुलांनी काम असेल तरच इंटरनेटचा वापर करतो असे सर्व्हेक्षणावेळी स्पष्ट केले.