शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'पदवीधर'साठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार उतरले मैदानात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 17:59 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांसाठी मराठवाड्यात करणार ६ दिवसांचा झंझावाती दौरा

ठळक मुद्देचार दिवसात सात जिल्ह्यात करणार प्रचार..... सोमवारी औरंगाबाद काढणार पिंजून..... विदर्भातही करणार  दोन दिवसीय दौरा..... 

औरंगाबाद : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आजपासून वैजापूर येथून झंझावती दौऱ्याला सुरुवात केली आहे. सहा दिवसांच्या दौऱ्यात ते आख्खा मराठवाडा पिंजून काढणार आहेत.  

येत्या १ डिसेंबर रोजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत  महाविकास आघाडिचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. रविवारपासून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी  प्रचारासाठी झंझावाती दौरा सुरु  करून मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. रविवारी  त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात संपर्क अभियानावर भर दिला. यावेळी मतदारांनी त्यांना उदंड  प्रतिसाद दिला. 

सोमवारी औरंगाबाद काढणार पिंजून..... मराठवाडा पदवीधर संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी औरंगाबाद येथील माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर वाळुज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, एमजीएम महाविद्यालय, नवखंडा महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट महाविद्यालय, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व महाविद्यालयांतील मतदारांशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. 

चार दिवसात सात जिल्ह्यात करणार प्रचार.....  महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील झंझावाती दौरा करणार आहे. त्यात मंगळवारी (ता. २४) जालना जिल्ह्यात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह प्रचार दौरा करणार आहेत. बुधवारी (ता. २५) सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची  नॅशनल एज्युकेशन सोसायटी येथे  बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (ता. २६) उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.तर शुक्रवारी (ता. २७) राज्यमंत्री अब्दुल सत्तार  नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 

प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती ..... राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दौऱ्याच्या दरम्यान महाविकस आघाडीतील सर्व घटक  पक्षांचे खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष ,  तालुकाध्य्क्ष, प्रमुख पदाधिकारी, संस्थाचालक, पदवीधर मतदार संघाचे मतदार यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.      विदर्भातही करणार  दोन दिवसीय दौरा..... राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे मराठवाड्याप्रमाणे  विदर्भातही  २८ आणि २९ नोव्हेंबर ला दौरा करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान  अमरावती शिक्षक मतदार संघाचे   महाविकास आघाडीचे उमेदवार  तर नागपूर पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार  अभिजित गोविंदराव  वंजारी  यांचा प्रचार करणार आहेत.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद