शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांचे पुष्पवृष्टीने स्वागत, पण भोवती गराडा कार्यकर्त्यांचा की बाऊन्सरचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 13:37 IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना वाय प्लस सुरक्षा आहेच, परंतु आज जरा जास्तच बंदोबस्त त्यांच्या ताफ्यात दिसल्याची चर्चा होती.

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना अपशब्द वापरल्याने टीकेचे धनी झालेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारी कडक बंदोबस्तात विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीला आले. विशेष म्हणजे या बंदोबस्तात खासगी बाऊन्सरचा देखील समावेश असल्याची चर्चा होती.

या बैठकीला येण्यापूर्वी सुभेदारी विश्रामगृहात सत्तार समर्थकांची मोठी गर्दी होती. समर्थकांनी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले. कृषिमंत्री सत्तार यांना वाय प्लस सुरक्षा आहेच, परंतु आज जरा जास्तच बंदोबस्त त्यांच्या ताफ्यात दिसल्याची चर्चा होती. विभागीय आयुक्तालयातील बैठकीनंतर सत्तार यांना पत्रकारांनी खा. संजय राऊत हे कारागृहातून बाहेर आल्याप्रकरणी विचारले असता, त्यांनी अतिशय सावध अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोण कुठून आले, कसे आले हे बोलण्याची आज वेळ नाही. कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. निकाल अजून मी वाचलेला नाही. खा. राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते वाघ आहेत की आणखी कोण आहेत? यावर मला काही टिप्पणी करायची नाही, नसता पुन्हा नवीन भूत माझ्या मागे लावाल. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. खा. सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मी सुरक्षित आहे, असे सांगून त्यांनी आयुक्तालयातून काढता पाय घेतला.

सत्तारांची सावधगिरी...सत्तार यांनी ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले. सत्तार यांच्या मुंबई व औरंगाबादेतील घरावर राष्ट्रवादी काँग्रेसने दगडफेक करत आंदोलने केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना जाहीर कार्यक्रमांना न जाण्याचा सल्ला दिल्याची चर्चा होती. त्यानंतर गुरुवारी आयुक्तालयात त्यांनी पीक विम्याबाबत बैठक घेतली. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. इतरवेळी माध्यमांना विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर चर्चेत येतील, अशी विधाने करणारे कृषिमंत्री सत्तार आज मात्र सावध उत्तरे देत होते. मी सुरक्षित असल्याचे सांगून त्यांनी प्रस्थान केले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना