शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम देशासाठी धोका’- अबू आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:19 IST

‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला.

ठळक मुद्देएमआयएमचा माजी प्रदेशाध्यक्ष समाजवादी पार्टीत

औरंगाबाद : ‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. नांदेडहून हे कार्यकर्ते अनेक वाहनांनी औरंगाबादला पोहोचले होते.

सुभेदारी गेस्ट हाऊसवर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने झालेल्या पत्रपरिषदेत आझमी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नरेंद्र मोदी व भाजपच्या सध्याच्या वाटचालीवर त्यांनी सडकून टीका केली. कायदा नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही. जे भाजपबरोबर ते देशप्रेमी आणि जे नाहीत ते देशद्रोही, असे सध्या चालू आहे. नॉन इश्यूज् निर्माण करून हिंदू- मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला जात आहे. मुस्लिम आणि दलित समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. हे राष्ट्र हिंदूराष्ट्र होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे आझमी यांनी नमूद केले.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, अच्छे दिन कहाँ है? जे होते तेही चालले गेले. नोटाबंदीने कंबरडे मोडले. बेरोजगारी कमालीची वाढली. उन्नाव- कठुआसारख्या घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच. ज्यांच्यावर गंभीर आरोप होते, अशी मंडळी सरसकट सुटत आहे, ही चिंतेची बाब होय, असे आझमी यांनी नमूद केले.

भाजपला सशक्त पर्याय उभा झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. पण याबाबतीत काँग्रेस मनमानी करताना दिसत आहे. अखिलेश यादव यांना तर देशचे पंतप्रधान व्हायचे नाही. राहुल गांधी हेच दावेदार आहेत. त्यांनी खरे तर यात चांगला पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेसची नीती चांगली आहे. पण आता नियत खराब होत चालली आहे. सॉफ्ट हिंदुत्ववाद त्यांनी स्वीकारणे योग्य वाटत नाही. अमरसिंग यांच्यामुळे समाजवादी पार्टीचे नुकसान झाले. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ही व्यक्ती बरोबर नाही, अशी अनेक विधाने अबू आझमी यांनी यावेळी केली.

मकब-यात नमाज पढण्याची परवानगी द्या...बीबीका मकबरा येथे नमाज पढू द्यायला हवे, अशी भावना आज आझमी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मकब-यालाही भेट दिली. त्यांनी सांगितले की, मकब-यात ३७५ जण नमाज पढू शकतात. ही परवानगी मिळायला हवी’

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAurangabadऔरंगाबादAbu Azmiअबू आझमी