शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

वाजपेयींच्या श्रद्धांजलीला नकार देणाऱ्या एमआयआम नगरसेवकास भाजप सदस्यांची मारहाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:03 IST

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीस एमआयएम नगरसेवकाने विरोध दर्शवल्याने त्याला भाजपच्या सदस्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत घडली. 

औरंगाबाद : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीस एमआयएम नगरसेवकाने विरोध दर्शवल्याने त्याला भाजपच्या सदस्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत घडली. 

आज महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात अली होती. सभेच्या सुरुवातीला माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला. 

दरम्यान, महापालिकेच्या आवारात भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडले. भाजप संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख यांची चारचाकी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे. 

कडक कारवाईची मागणी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांच्यावर कडक कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा व त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली आहे. 

सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मारहाणीच्या घटनेनंतर विशेष सभेत मतीन यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करावे, तसेच त्यांचावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा ठराव घेण्यात आला. 

पाहा व्हिडिओ - 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपा