शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता आजपासून बंद; उद्या १५ तासांसाठी सहा मार्गांवर वाहनांना बंदी

By सुमित डोळे | Updated: April 13, 2024 19:41 IST

क्रांती चौक ते मिलकॉर्नर दरम्यान ७२ मिरवणुकांचा सहभाग, ७७ ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी पारंपरिक ढोलताशांची तयारी सुरू आहे. सामाजिक उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासूनच बंदोबस्त तैनात असेल. त्याशिवाय मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवरील वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे.

सायंकाळपासून भडकल गेट, सिटी क्लब रस्ता बंदडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सायंकाळी ६ वाजेपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्या धर्तीवर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत भडकलगेट ते सिटी क्लब हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.- रविवारी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील-महावीर चौक (बाबा पेट्राेल पंप) ते अमरप्रीत चौक.-गोपाल टी, क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठण गेट, बाराभाई ताजिया, गुलमंडी, सुपारी हनुमान मंदिर, उत्तम मिठाई भांडार, सिटी चौक, जुना बाजार, मुख्य पोस्ट ऑफिस, भडकल गेट.-शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक.-औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजिया.-मिल कॉर्नर ते सिटी क्लब-एन-१२ नर्सरी, गोदावरी पब्लिक स्कूल, टी.व्ही. सेंटर, एन-९, अयोध्यानगर, शिवनेरी काॅलनी, एन-७ शॉपिंग सेंटर.- दरवर्षीप्रमाणे मुख्य मिरवणूक क्रांती चौकातून सुरू होऊन भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल.-क्रांती चौक ते मिलकॉर्नर दरम्यान एकूण ७२ मिरवणुकांचा सहभाग.-हडको सिडको समिती उत्सवादरम्यान १६ मिरवणुकांचा सहभाग.-सतरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १२६ मिरवणुका.-शहरात विविध ७७ ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होतील.

एकूण ६० व्यासपीठांद्वारे नागरिकांचे स्वागतएकूण ६० व्यासपीठांद्वारे नागरिकांचे स्वागत केले जातील. यामध्ये क्रांती चौकात ४२, सिटी चौक १३ तर सिडकोत ५ व्यासपीठांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीAurangabadऔरंगाबाद