शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोजचे वाद मिटेनात, संतापून प्रेयसीच्या घरातच प्रियकराने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:33 IST

boyfriend committed suicide at his girlfriend's house: प्रेयसीने अनेक वेळा प्रियकराच्या घरी जाऊन तिच्यासोबत राहण्यासाठी गोंधळ घातला होता.

औरंगाबाद : प्रियकराने प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यायनगरमध्ये शनिवारी सायंकाळी घडली (boyfriend committed suicide at his girlfriend's house) . प्रेयसीसह तिच्या दोन नातेवाईक महिलांनी त्यास घाटी रुग्णालयात आणून दाखल करीत तेथून पळ काढला. अमाेलराजे भाऊसाहेब चव्हाण (वय ३२, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. अमोलच्या नातेवाईकांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा आरोप केला.

एका हॉटेलात स्वयंपाकी असलेल्या अमोलराजेचे न्यायनगरातील रेश्मा (नाव बदलले आहे) सोबत प्रेमसंबंध होते. तो विष्णूनगरात आई, वडिलांसोबत राहत होता. त्याची प्रेयसी न्यायनगरमध्ये १५ व १३ वर्षांच्या दोन मुलांसाेबत राहते. या दोघांमध्ये सतत खटके उडत होते. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तो रेश्माच्या घरी गेला. तेव्हाही दोघांत वाद झाला. या वादातून ती दोन मुलांसोबत घरातून बाहेर निघून गेली. तेव्हा घरात एकटाच असलेल्या अमोलराजेने दार बंद करून गळफास घेतला. 

हा प्रकार उघडकीस आल्यावर रेश्मासह अन्य दोन महिलांनी एका रिक्षा चालकाच्या मदतीने त्याला घाटीत आणले. घाटीच्या अपघात विभागात अमोलचा मृतदेह टाकून तिघींनी रिक्षाने पळ काढला. अमोलच्या गळ्यावर व्रण असल्यामुळे अपघात विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खुनाचा संशय व्यक्त केला. तिघीही रिक्षातून पसार झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ घाटी चौकीतील पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अपघात विभागातील सीसीटीव्हीची तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक ठळकपणे दिसून आला. त्यावरून तिघींना पोलिसांनी शोधले. तसेच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत गळफास घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृताच्या घरी येऊन गोंधळअमोलच्या वडिलांना अर्धांगवायू असल्यामुळे ते अंथरुणाला खिळून आहेत. तीन बहिणी असून, आई घरकाम करते. सर्व कुटुंबाचा भार अमोलवरच होता. अमोलच्या प्रेयसीने अनेक वेळा त्याच्या घरी जाऊन तिच्यासोबत राहण्यासाठी गोंधळ घातला होता. त्यामुळे अमोलच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमा होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहायक निरीक्षक एस. के. खटाणे यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद