शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी वाळूज पोलीस : जीवे मारण्याची धमकी देत नराधमाचा विवाहितेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 21:04 IST

दोन चिमुकल्यांसह घरात एकटी झोपलेल्या विवाहितेसह तिच्या बाळांना जीवे मारण्याची धमकी देत, एका नरधमाने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

औरंगाबाद - दोन चिमुकल्यांसह घरात एकटी झोपलेल्या विवाहितेसह तिच्या बाळांना जीवे मारण्याची धमकी देत, एका नरधमाने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.दादासाहेब घाडगे(रा. रांजणगाव शेणपुंजी)असे अटकेतील नराधमाचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार २५ वर्षीय विवाहिता रांजणगाव येथे पती आणि दोन चिमुकल्यासह भाड्याने राहतात. आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी असलेल्या मंडपवाल्याकडे काम करतो. पीडितेच्या लहान मुलांना तो खेळवत असत यामुळे पीडितेसोबत त्याची चार ते पाच वर्षापासून ओळख होती. शनिवारी रात्री पीडितेचा पती कंपनीत कामाला गेल्याने ती मुलांबाळासह घरात एकटीच झोपली होती. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेचे दार वाजविले. पती ड्युटीवरून आला असेल, असे समजून पीडितेने दार वाजविताच आरोपीने तिला ढकलून देत प्रथम दाराची कडी आतून लावून घेतली. यावेळी त्याने एका हाताने पीडितेचे तोंड तर दुसºया हाताने गळा दाबून त्याने तिला आणि तिच्या चिमुकल्यांना जीवे मारण्याची धमकी देत गप्प राहण्याचे सांगितले. नराधम आपले अथवा दोन्ही चिमुकल्यांचे बरेवाईट करील या भितीपोटी ती गप्प राहिली. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याचवेळी पीडितेचा पती ड्युटीवरून घरी परतला तेव्हा दाराची कडी उघडून तो पाणी पिण्यासाठी आलो होतो,असे सांगून तेथून पळून गेला. यानंतर पीडितेने घडलेली घटना पतीला सांगितली. तिच्या नातेवाईकांनी तिला  धीर देत आज सकाळी तिला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेतली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपी दादासाहेब घाडगे  यास अटक केले,अशी माहिती पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली.