शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'मी भिमाला रमाला इथे पाहतो'; 'रमाई पहाट'च्या अभिनव मैफलीत छ. संभाजीनगरवासीय मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:21 IST

असे अभिवादन कधी पाहिले नसेल! 'रमाई पहाट'मध्ये पारंपरिक वाद्ये आणि आधुनिकतेचा संगम

छत्रपती संभाजीनगर: शनिवारची सकाळ माता रमाईच्या त्यागाचा सुगंध आणि भीमस्वरांचा झंकार घेऊन आली. निमित्त होते त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे. सिडको कॅनॉट परिसरात शुभ्र वस्त्रात नटलेला जनसागर आणि राज्यभरातून आलेल्या तरुण तडफदार कलावंतांच्या अवििष्काराने 'रमाई पहाट' ही केवळ एक मैफल न राहता, तो एक अनुपम अभिवादन सोहळा ठरला.

सकाळच्या नीरव शांततेत भदंत करुणानंद महाथेरो यांच्या सुश्राव्य बुद्धवंदनेने परिसराला जाग आली. मागील दोन वर्षांपासून कुणाल वराळे, चेतन चोपडे, अजय देहाडे, सचिन भुईगळ, अक्षय जाधव आणि विजय पवार या 'नवरत्नांच्या' पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. प्रारंभी या संचाने "मी भिमाला रमाला इथे पाहतो" हे समूहगीत सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला.

गायन सत्रात कुणाल वराळे यांनी "अशी रमाई माझी माय" हे आर्त गीत सादर केले. विजय पवार, सचिन भुईगळ (भीमाच्या कोटावर रमा जशी सोनसाखळी) आणि चेतन चोपडे (रमा अशी गुलमोहरी मिळाली) यांनी माता रमाईंच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रख्यात गायक अजय देहाडे यांनी "नऊ कोटीची माता" आणि "जा जगाला सांग, बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर" ही गीते सादर करताच हजारो उपस्थितांनी ठेका धरला.

हलगीची आणि संबळची जुगलबंदी रंगलीया सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते अहिल्यानगर येथील अविनाश शिंदे आणि संच यांचे संबळ वादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात संबळ वाजविणाऱ्या कलावंतांची ही १७ वी पिढी असून, त्यांच्या पारंपरिक पोषाखातील सादरीकरणाने अंगावर शहारे आणले. याच वेळी कन्नडच्या लिंभोरा येथील ओमसाई ग्रुपच्या हलगीची आणि संबळची अतितटीची जुगलबंदी रंगली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

स्त्रीशक्तीचा जागरस्त्रीशक्तीचा बहारदार आविष्कार या सोहळ्यात पाहायला मिळाला. वैष्णवी गीते आणि सानिका कुलकर्णी या तरुणींनी ढोलकीवर तोडा आणि छकडी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कोमल बोर्डे यांचा सॅक्सोफोन, समृद्धी भालेराव व अनुष्का डोंगरे यांचे व्हायोलिन वादन 'रमाई पहाट'चा दर्जा उंचावून गेले. अमरावतीहून आलेल्या पल्लवी व प्रवीण खाडे या बालकलावंतांच्या बेंजो वादनाने अंतरमनाचा ठाव घेतला. सोबतच एका पाच वर्षीय ढोलकीपटूनेही सर्वांचे लक्ष वेधले.

रॅपने तरुणाईची मने जिंकलीआधुनिक रॅप संगीतातून प्रबोधन करताना मुंबईचा रॅपर गोपू याने 'मासिक पाळी' सारख्या विषयावर रॅप सादर करून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. तर शहराची रॅपर व्हीआयपी श्रावस्ती हिने रमाईंवरील रॅप सादर करून तरुणाईची मने जिंकली.

प्रबोधन आणि चित्तथरारक मल्लखांब कवायतीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रमाई नाटकाने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. रमाई महिला मंडळाच्या मुलींनी लेझीम नृत्यातून लक्ष वेधले. वैचारिक प्रबोधन करताना कवी नारायण पुरी यांच्या 'जांगडगुत्त्याने' प्रेक्षक हसून लोटपोट झाले तर कवी अविनाश भारती यांची "गावकुसाबाहेर" ही कविता आत्मचिंतन करायला भाग पाडणारी ठरली. कार्यक्रमाची सांगता टायगर ग्रुपच्या दोरीवरील चित्तथरारक मल्लखांब कवायतीने झाली. सद्दाम शेख यांनी आपल्या दिलखेचक निवेदन केले. सूर्य माथ्यावर येईपर्यंत चाललेला हा सोहळा शिस्तबद्धता आणि स्वच्छतेचा नवा आदर्श घालून देऊन गेला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ramatai's sacrifice honored: 'Ramai Pahat' mesmerizes Aurangabad with music, performances.

Web Summary : Aurangabad celebrated Ramatai Ambedkar's 127th birth anniversary with 'Ramai Pahat', a vibrant event featuring music, dance, and social messages. Artists showcased talent through songs, traditional performances, and thought-provoking rap, captivating the audience until sunrise.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर