शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मिरची व्यापाऱ्याने एनआरआयला घातला ४७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:19 IST

मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेने नोंदविला गुन्हा : व्यवसायात पैसे गुंतविल्यास दरमहा आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली दाखविले आमिष

औरंगाबाद : मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.मोहम्मद रफियोद्दीन मोहम्मद जैनू सालेहीन (रा. बारी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हिमायतबाग एन-१३, येथील रहिवासी मोहंमद खलीलउल्ला सिद्दीकी गुलाम हे अनिवासी भारतीय आहेत. ते नोकरीनिमित्त ओमान देशात राहतात. त्यांचे किलेअर्क येथेही घर आहे. ते तीन ते चार महिन्यांतून एकदा औरंगाबादेत येतात आणि काही दिवसांनंतर परत ओमानला जातात. २०१५ मध्ये त्यांची एका मित्राकडून आरोपी रफियोद्दीनसोबत भेट झाली. त्यावेळी त्याने तो गावाबाहेरील मार्केटमधून मिरची खरेदी करून उदयपूर, अहमदनगर, सांगली येथे विक्रीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या व्यवसायात वार्षिक ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, असे त्याने सांगितले. तुम्ही पैसे गुंतविल्यास लाखाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिमहिना रक्कम मिळेल, असे तो म्हणाला. खलीलउल्ला यांनी जानेवारी २०१५ मध्ये त्याला ३ लाख २५ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर दोन महिन्याचा मोबदला म्हणून ६ हजार रुपये आरोपीने त्यांना दिले. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी ४ लाख ३० हजार रुपये, १५ मार्च २०१६ रोजी दोन लाख रुपये रोखीने तर ६ मे २०१६ रोजी धनादेशद्वारे ३४ लाख ५५ हजार रुपये दिले. शारजा येथे असताना त्यांनी डिमांड ड्राफ्टद्वारे रफियोद्दीनच्या बँक खात्यात ३ लाख ६२ हजार ६४७ रुपये असे एकूण ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपये दिले. त्याला तीन वेळा पैसे मिळाल्याचे रफियोद्दीनने डायरीवर लिहून दिल्याचे खलीलउल्ला यांनी तक्रारीत नमूद केले. गुंतविलेल्या रकमेवर आरोपीने खलीलउल्ला यांना नोव्हेंबर २०१७ पर्यंत काही प्रमाणात परतावा दिला. त्यानंतर मात्र मार्केट डाऊन आहे. व्यापाºयांकडून पैसे आले नाही, जीएसटीचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशी विविध कारणे सांगून पैसे देणे बंद केले. गुंतवणूक केलेली रक्कम खलीलउल्ला यांनी परत मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच खलीलउल्ला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली.मिरची व्यापाºयाचा आणखी एकाला १९ लाखांचा गंडाखलीलउल्ला यांच्याप्रमाणेच त्यांचे मित्र कलीमउल्लाह खान इब्राहिम खान (रा.रोहिल्ला गल्ली) यांचीही आरोपी रफियोद्दीनने १९ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, पोहेकॉ. अरुण वाघ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी