शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘म्याव म्याव,चीज, दवा' ड्रग्जसाठी अनेक कोडनेम; तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात

By संतोष हिरेमठ | Updated: October 24, 2023 12:38 IST

मानसिक आरोग्यावर परिणाम : ड्रग्जच्या व्यसनाने गाठावे लागते रुग्णालय

छत्रपती संभाजीनगर : ‘म्याव म्याव’, चीज, दवा है क्या...अशी विचारणा तरुणाईमध्ये बिनधास्तपणे होते. तुम्ही म्हणाल ही कशाची नावे आहेत? ही काही खाद्यपदार्थांची नावे नाहीत, तर ही काही ड्रग्जची सांकेतिक नावे आहेत आणि नशेखोरांमध्ये अगदी सहजपणे बोलली जातात. पुणे, मुंबई, नाशिकपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरही ड्रग्जच्या उद्योगाने हादरून गेले आहे. शहरात रविवारी घडलेल्या कारवाईने ड्रग्ज उद्योग शहरात किती खोलवर पोहोचला आहे, याची कल्पना येते.

कोरोना प्रादुर्भावानंतर तरुणाईमध्ये ड्रग्जचे व्यसन वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. व्यसन दारूचे असो, तंबाखूचे, सिगारेटचे असो की ड्रग्जचे, कधी ना कधी व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

कोणकोणत्या पदार्थांची नशा?छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखाेरी दिवसेंदिवस वाढत आहे. मद्यपान, गांजापाठोपाठ नशेसाठी चिकटवण्यासाठी वापरला जाणारा एक द्रव, झोपेच्या गोळ्यांचे सेवन तर वाढतच आहे; परंतु शहरातील तरुणाई कोकेन, एमडी, ब्राऊन शुगर, चरसच्या विळख्यात सापडत आहे. नशेसाठी सहज उपलब्ध असलेल्या व्हाइटनर, बूट पॉलिशसाठी वापरले जाणारे पॉलिश, पेनबाम, नेलपेंट, झोपेच्या गोळ्या, अगदी पेट्रोलचाही नशेसाठी वापर केला जातो. परंतु, त्याबरोबर ब्राऊन शुगर, चरस, कोकेन, एमडी अशा अमली पदार्थांची नशा करणारेही आढळून येतात. थेट ड्रग्जचे नाव घेण्याऐवजी वेगवेगळ्या नावांनी उल्लेख केला जातो. ही सांकेतिक नावेही सतत बदलली जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आठवडाभरात २ ते ३ जणकाही लोक तणावापासून दूर जाण्यासाठी किंवा स्वतःची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा आपल्या मित्रपरिवाराच्या दबावाखाली येऊन किंवा व्यवसायाची गरज म्हणून किंवा कधी आनंद साजरा करण्यासाठी व्यसनाची सुरुवात करतात. आठवडाभरात २ ते ३ रुग्ण येतात.- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ

लक्षणांकडे दुर्लक्ष नकोकाही तरी नवीन किंवा धोकादायक करण्याची इच्छा ही किशोरवयीन विकासाचा एक सामान्य भाग आहे. अशा वेळी व्यसनाकडे वळण्याची अधिक शक्यता असते. मुलांकडे, त्यांच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

दूरगामी परिणामव्यसनाचे मानसिक आणि शारीरिक असे दूरगामी परिणाम होतात. काही नशेचे पदार्थ स्वस्त, तर काही महाग असतात. व्यसनामुळे त्रास वाढल्यानंतर काही जण स्वत:च, तर काही जणांना नातेवाईक घेऊन येतात.- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ

काय म्हणते तरुणाई?व्यसनापासून दूर राहिलेले बरेव्यसन कोणतेही असो, त्यापासून तरुणांनी दूरच राहिलेले बरे. कोणत्याही व्यसनाला बळी पडता कामा नये.- ओंकार सोनटक्के

कुटुंबीयांचा विचार करावाव्यसन करण्यापूर्वी तरुणांनी कुटुंबीयांचा विचार केला पाहिजे. कुटुंबीय मोठी मेहनत करून मुलांना वाढवितात, शिकवितात.- अभिजित पवार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी