शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Men's day: पुरूष हक्कदिनी पत्नी पीडितांनी केले शीर्षासन; स्वतंत्र 'पुरुष आयोगा'ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 17:56 IST

पत्नीच्या छळामुळे त्रस्त असलेल्या पत्नी पीडितांचे समुपदेशन पत्नी पीडित आश्रमात केले जाते

वाळूज महानगर (औरंगाबाद) : कौटुंबिक वादात महिलांकडून पुरूषांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पत्नी पीडितांनी शनिवार (दि. १९) करोडीत पुरुष हक्क दिनाचे औचित्य साधून शीर्षासन आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत पुरुषांच्या हक्कासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली.

करोडी येथील पत्नी पीडित आश्रमात शनिवारी शीर्षासन आंदोलन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, चरणसिंह घुसिंगे, सोमनाथ मनाळ, भाऊसाहेब साळुंके, संजय भांड, वैभव घोळवे, श्रीराम तांगडे आदींच्या हस्ते आश्रमातील कावळ्याच्या प्रतिमेची पूजा करून. केक कापून पुरूष हक्क दिन साजरा करण्यात आला. यानंतर पत्नी पीडितांनी शीर्षासन करीत विविध घोषणा देत आश्रमाचा परिसर दणाणून सोडला.

कौटुंबिक वादातून काही महिला पती, पतीच्या नातेवाईकांविरुद्ध ठिकठिकाणी तक्रारी करून त्रास देतात. बहुतांश कायदे महिलांच्या बाजूने असल्याने त्यांचा आधार घेत महिला पती व त्यांच्या कुटुंबीयांचा छळ करीत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आल्याच्या प्रतिक्रिया पत्नी पीडितांनी व्यक्त केल्या.

पाच वर्षांत १० हजार पत्नी पीडितांच्या तक्रारीपत्नी पीडितांना न्याय देण्यासाठी अॅड. फुलारे यांनी करोडी येथे आश्रम सुरू केला आहे. तेथे पत्नीच्या छळामुळे त्रस्त असलेल्या पत्नी पीडितांचे समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक सल्ला देण्यात येतो. २०१७ पासून गेल्या ५ वर्षांत देशभरातील एकूण ९ हजार ७५३ पुरुषांनी या आश्रमात पत्नीकडून छळ होत असल्याच्या तक्रारी दिल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत समुपदेशनपुरुष हक्क दिनानिमित्त कार्यशाळेत अॅड. फुलारे यांनी पत्नी पीडितांच्या व्यथा जाणून घेत त्यांना विविध कायद्यांविषयी माहिती दिली. पत्नीने छळाची तक्रार दिल्यानंतर न्यायालयात बाजू कशी मांडावी, याबाबत समुपदेशन करण्यात आले. कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यावर वर्षभरात प्रकरण निकाली काढावे, महिलांच्या बाजुने असलेले कायदे रद्द करण्यात यावेत, पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, प्रत्येक पोलिस ठाण्यात पुरूष दक्षता समिती स्थापन करावी, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय पत्नी पीडितांनी घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक