शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औषधी गोळ्यांचा मूळ दर ६५ रुपये, विक्री १२०० रुपयांत; एका गोळीची ४८ तास नशा

By सुमित डोळे | Updated: December 16, 2023 13:00 IST

नशेखोरांना चोरट्या मार्गाने एजंटकडून १२०० रुपयांत विक्री होते गोळी

छत्रपती संभाजीनगर : मानसिक रोगासाठी, जळालेल्या रुग्णांच्या उपचारांवर डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या औषधांचा शहरात सर्रास नशेसाठी वापर केला जात आहे. जिन्सी पोलिसांनी गुरुवारी या रॅकेटमधील तिघांना अटक केली. मोहम्मद दादामिया पठाण असे विकणाऱ्याचे नाव असून, इमरान कबीर बातुक (३३, रा. किराडपुरा) व सलमान खान आरेफ खान (२१, रा. बायजीपुरा) हे विकत घेण्यासाठी आले होते.

पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील नशेखोरीवर सक्तीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी त्यानुसार सापळा रचला होता. गुरुवारी खबऱ्याने त्यांना मोहम्मद दोन तरुणांना गजीबो हॉटेलच्या गल्लीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. औषध निरीक्षक बी. डी. मरेवाड यांना सोबत घेत गांगुर्डे यांनी सापळा रचला. इमरान व सलमान दोघेही गोळ्यांसाठी वाट पाहत होते. मोहम्मद ने येऊन त्यांना गोळ्या सुपूर्द करताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यात एकूण ११० गोळ्या आढळून आल्या. त्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

दामदुपटीने विक्री, एका गोळीची ४८ तास नशातरुणांना सुरुवातीला व्यसन लागेपर्यंत एजंटकडून माफक दरात गोळ्यांची विक्री केली जाते. त्याचे व्यसन लागून संबंधित तरुण नशेला आहारी जाताच मग दर वाढवून विक्री होते. बऱ्याचदा स्टॉकच नाही, असे सांगून एका स्ट्रिपचा ६५ ते ८० रुपयांपर्यंत मूळ दर असलेल्या या गोळ्यांची विक्री १ हजार ते १२०० रुपयांना केली जाते. याचे मूळ विक्रेते मात्र पोलिसांना मिळून येत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद