शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

‘मेडिकल टुरिझम’ला हवे विमानसेवेचे ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:04 IST

शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो.

ठळक मुद्दे विमानसेवा वाढीकडे लक्ष: परदेशांतून उपचाराकरिता शहरात येण्यासाठी मिळावे प्रोत्साहन

औरंगाबाद : शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो. त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढीसाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरूआहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. एकेकाळी शहरातील बहुतांश हृदयरोगी उपचारासाठी पुणे-मुंबई येथे जात होते. मात्र, आता हृदयरोगावरील उपचार, अवयव प्रत्यारोपासह बहुतांश आजारांवरील उपचार शहरातच शक्य झाले आहेत. शहरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत. विविध रुग्णालयांमध्ये परदेशातून आजघडीला ४०० ते ५०० परदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी दाखल होतात. विशेषत: आखाती देशांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शहरात अधिक संख्येने परदेशी रुग्ण येण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवे. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.शासनाच्या अनास्थेमुळे औरंगाबादेत मेडिकल टुरिझम वाढीसाठी फारसे प्रयत्न होत नाही. सध्या परदेशी रुग्णांना शहरात आकर्षित करण्यासाठी केवळ रुग्णालयांकडून प्रयत्न होत आहेत; परंतु विमानसेवेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल,असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.विमानसेवा वाढावीवैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने विमानसेवा वाढली पाहिजे. सोबतच शहरातील रस्त्यांचा आणि शहराचा विकास करण्याची गरज आहे. हा विकास झाला तरच मेडिकल टुरिझम वाढीला हातभार लागेल.-डॉ. कुलदीपसिंग राऊळ, अध्यक्ष, आयएमएठरावीक वेळेचे गणितरुग्ण, डॉक्टर आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने विमानसेवेत वाढ झाली पाहिजे. हृदय, यकृतासारखे अवयव प्रत्यारोपण हे ठरावीक वेळेच्या आत होणे गरजेचे असते. नोंदणी झालेल्या रुग्णाचे उपलब्ध अवयव गतीने हलविता आले पाहिजे.-डॉ. अजय रोटे, सीईओ, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलकनेक्टिव्हिटी महत्त्वाचीशहरात वैद्यकीय उपचाराचे दर मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहे. सध्या आखाती देशांतून उपचारासाठी येणाºयांचे प्रमाण अधिक आहे. मेडिकल टुरिझम वाढीसाठी हवाई कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून त्यात वाढ झाली पाहिजे.-डॉ. विकास देशमुख, अध्यक्ष, सर्जिकल सोसायटी

टॅग्स :Medicalवैद्यकीयtourismपर्यटन