शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू

By admin | Updated: April 18, 2016 00:53 IST

तुळजापूर : भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना रविवारी

तुळजापूर : भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ शिवारात घडली़ अपघातानंतर फरार होण्याच्या प्रयत्नातील कंटेनर तामवाडी शिवारात पकडण्यात आला असून, चालकाने मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळ काढला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील महादेव गजेंद्र लांडगे (वय-२९) व त्यांचा भाच्चा विनोद रामा हट्टेखोर (वय-१४) हे दोघे रविवारी सकाळी शेतातील जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेले होते़ शेतातील काम झाल्यानंतर मामा-भाच्चे हे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- बी़७६०४) वरून गावाकडे येत होते़ त्यांची दुचाकी रवि कापसे यांच्या शेताजवळील महामार्गावरील पुलावर आली असता तुळजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्ऱएच़आऱ३८-यू़७४५८) जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव लांडगे व त्यांचा भाच्चा विनोद हट्टेखोर यांचा जागीच मृत्यू झाला़घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मयतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले़ शवविच्छेदनानंतर मयतांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ अपघातात मामा-भाच्यांचा जागीच मृत्यू झाल्याने सिंदफळ गावावर शोककळा पसरली आहे़ मयत महादेव लांडगे यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे़ या अपघात प्रकरणी अनिल लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि दासरवाड हे करीत आहेत़ (वार्ताहर)