शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडच्या फ्लॅटसाठी चीनवरून साहित्य; २१ कोटींचा घोटाळा, क्लर्ककडे ५ फ्लॅट, BMW कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:29 IST

मागेल त्या रकमेत फ्लॅट्सची खरेदी, पोलिसांच्या पाहणीत आणखी तीन फ्लॅट उघड; गुन्हा दाखल झाल्यानंतरही फ्लॅटच्या इंटेरिअरचे काम सुरू

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीतून २१ कोटी ५९ लाख लंपास करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागर याने एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच फ्लॅट खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी विमानतळ परिसरात प्रेयसीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटच्या सजावटीसाठी त्याने चीनहून महागड्या वस्तूदेखील मागवल्या. फ्लॅटमध्ये बदल करण्यासाठी खरेदी केलेले जवळपास २० लाख रुपयांचे साहित्यदेखील आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी क्रीडा विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलात हा अजब घोटाळा उघडकीस आला. अवघा तेरा हजार रुपये पगार व पदवीपर्यंत शिक्षण असलेला हर्षकुमार कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून जानेवारी २०२३ मध्ये या विभागात नोकरीस लागला होता. उपसंचालकांच्या लेटरहेडच्या मदतीने बँकेला दिलेल्या अधिकृत ई-मेल आयडीमध्ये बदल करत त्याने विभागाला येणारा निधीच स्वतःच्या विविध खात्यांवर वळता करून अकरा महिन्यांत कोट्यवधींचा घोटाळा केला. यात त्याचे भागीदार असलेले यशोदा शेट्टी व तिचा पती जीवन कार्यप्पा विंदडा यांची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

आणखी दोन लिपिकांचे जबाबतपास पथकाने मंगळवारी क्रीडा विभागात हर्षकुमारसोबत काम करणाऱ्या दोन कंत्राटी लिपिकांची तीन तास चौकशी करून जबाब नोंदवले. विभागातील अन्य अधिकाऱ्यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पथकाने हर्षकुमारच्या नावाने किती बँकांमध्ये खाती आहेत, याची माहिती मागवली आहे.

इंटेरिअरसाठी चीनहून वीस लाखांचे साहित्यहर्षकुमारने विमानतळ परिसरातील एका इमारतीत एका शासकीय अधिकाऱ्याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यासाठी त्याने दोन लाख रुपये ॲडव्हान्सही दिला. त्याच इमारतीत प्रेयसीच्या नावाने सहा खोल्यांचा दोन कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला. त्याचे नुकतेच नूतनीकरण सुरू केले. आर्किटेक्टला त्याने पूर्ण फ्लॅट बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. महागड्या उच्च दर्जाच्या फरशादेखील खरेदी केल्या. चीनहून सजावटीचे साहित्य मागवले. अंबड तालुक्यातील असलेला हर्षकुमार विंदडाच्या नावावर घेतलेली कार घेऊन पसार झाला आहे. त्याची प्रेयसीदेखील गायब आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी