शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मशिप्रमं’वर पुन्हा सत्ताधाऱ्याचा झेंडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:03 IST

धर्मदाय आयुक्तांनी विरोधी गटांची याचिका फेटाळल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर पुन्हा एकदा आ. सतीश चव्हाण गटाचेच वर्चस्व असणार हे स्पष्ट झाले. रविवारी ४ जून रोजी या संस्थेत केंद्रीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे४ जून रोजी निवडणूक : वाढीव १८२ सदस्य करणार मतदान

राम शिनगारेऔरंगाबाद : धर्मदाय आयुक्तांनी विरोधी गटांची याचिका फेटाळल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर पुन्हा एकदा आ. सतीश चव्हाण गटाचेच वर्चस्व असणार हे स्पष्ट झाले. रविवारी ४ जून रोजी या संस्थेत केंद्रीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे.

मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत गेल्या वेळी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, आ. सतीश चव्हाण यांनी विजय मिळविला. सध्या त्यांच्या विरोधात असलेले उद्योजक पद्माकरराव मुळे आणि मानसिंग पवार यांनी सत्ताधारी गटाने सभासद नोंदणी वाढविण्यावर आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. ही याचिका गुरुवारी धर्मादाय आयुक्तांनी फेटाळली.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ १० जुलै रोजी पूर्ण होत आहे. यामुळे विद्यमान सचिव आ. चव्हाण यांनी १८ मे रोजी अधिसूचना काढत आगामी कार्यकारिणीच्या निवडीसाठी ४ जून रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभा आयोजित केली. यात पुढील पाच वर्षांसाठीच्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. मागील वेळी निवडणूक झाली तेव्हा संस्थेचे १७९ सदस्य होते. यातील अनेक जण मयत झाल्यामुळे हा आकडा १६१ पर्यंत खाली आला. याचवेळी मागील काही महिन्यांमध्ये विद्यमान केंद्रीय कार्यकारिणीने १८२ जणांना संस्थेचे सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गोपनीय ठेवण्यात विद्यमान कार्यकारिणीला यश आले होते. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर नवीन सदस्यांसह निवडणुकीची माहिती विरोधकांच्या हाती आली. तेव्हा या निवडणुकीत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका संस्थेचे सदस्य मुळे आणि पवार यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केली होती. याचिकेवर धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी निर्णय दिला आहे. या निर्णयावरही दोन्ही गटांनी परस्पर मत व्यक्त केले आहे. सत्ताधारी गटानुसार धर्मादाय आयुक्तांनी सर्व दावे मंजूर केले आहेत, तर विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगितले. यामुळे हा निकाल कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात नसल्याचा दावा केला आहे. आता ४ जून रोजी निवडणूक होणार असल्याने वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडते हेदेखील स्पष्ट होणार आहे.

सहा जिल्ह्यांत संस्थेचा विस्तारमराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी विनायकराव पाटील, दादासाहेब सावंत यांनी १९५८ साली समविचारी लोकांना एकत्र घेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ६० वर्षांत या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. मराठवाड्यातील नांदेड व लातूर वगळता सहा जिल्ह्यांत २३ वरिष्ठ महाविद्यालये, ३७ कनिष्ठ महाविद्यालये, ५६ माध्यमिक शाळा, मराठी माध्यमाच्या १४ शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिकच्या ६ शाळा, अशा संस्थेच्या एकूण १३५ शाखा आहेत.३४३ सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळालासंस्थेच्या कार्यकारिणीने सर्व जुन्या-नव्या सदस्यांच्या यादीसह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, नवीन सदस्यांच्या नावावर आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे त्याविरोधात याचिका दाखल केली. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी आमचे सर्व दावे मंजूर केले आहेत. यामुळे एकूण ३४३ सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असून, ४ जून रोजी सकाळी १० वाजता नियोजित वेळेनुसार निवडणूक होईल.-आ. सतीश चव्हाण, विद्यमान सरचिटणीसआम्ही लढाई लढणारधर्मादाय आयुक्तांनी आमची याचिका फेटाळलेली नाही. धर्मादाय कोर्टाने हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे हा कोणाच्याच बाजूने निकाल लागलेला नाही. यातच उच्च न्यायालयाला सुट्या आहेत. यामुळे पुढे याचिका दाखल करण्यास वेळ नाही. मात्र, आम्ही पुढची लढाई लढणार आहेत. सध्या सत्ताधारी गटाला फायदा झाला आहे. सोमवारी होणाºया निवडणुकीत उभे राहायचे की नाही, याचा निर्णय रविवारी घेण्यात येईल.-पद्माकरराव मुळे, ज्येष्ठ सदस्य, मशिप्रमं

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालयMarathwadaमराठवाडा