शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

२ लाख रुपये देऊन लग्न केले, मात्र, तासाभरातच गाडीवर हल्ला; वधूचे रोकडसह पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:15 IST

साताऱ्यातील तरुणाची फसवणूक; वाहनावर हल्ला करून गुंडांची पळण्यास मदत

छत्रपती संभाजीनगर : एजंटमार्फत लग्नासाठी १ लाख ८० हजारांत मुलगी देण्याचे आमिष दाखवून खोटे लग्न लावले. पैशांची देवाण- घेवाणही झाली. मुलाकडचे नववधूला घरी घेऊन जात असतानाच अज्ञात टोळीने त्यांच्या वाहनावर हल्ला चढवत मुलीला घेऊन पळ काढला. मंगळवारी रात्री उशिरा या घटनेप्रकरणी एजंट नंदकुमार चव्हाण (रा. कोरेगाव, ता. सातारा), वधू बनण्याचे नाटक केलेली दिशा माधव कदम व माेनिका यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील आर्वी गावातील ३९ वर्षीय महेश यादव या शेतकऱ्याचे लग्न ठरत नव्हते. २५ जुलै रोजी त्यांच्याच तालुक्यातील चव्हाणने त्यांच्या घरी जात छत्रपती संभाजीनगरचे एक स्थळ असल्याचे सांगितले. दिशाचे छायाचित्र दाखवल्यानंतर कुटुंबाने लग्नास होकार दिला. तेव्हा मोनिका नामक महिलेने संपर्क साधून लग्नासाठी १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली. त्यासही यादव कुटुंब तयार झाले. २९ जुलै राेजी महेश कुटुंबासह शहरात आले. मोनिकाने त्यांना दिशाच्या आंबेडकरनगरमधील घरी नेऊन चहा पाजला.

कपड्यांची खरेदी, न्यायालयासमोर लग्नसायंकाळी सर्वांनी साड्या व अन्य कपड्यांची टिळक पथ येथून खरेदी केली. आरोपींनी त्यांना कौटुंबिक न्यायालयासमोर नेत येथेच कोर्ट मॅरेज केले जाते, असे सांगत एका वकिलाकडे नेले. तेथे नोटरी बनवून लग्न झाल्याचे घोषित केले. तेव्हा महेश यांनी माेनिकाला १ लाख रोख, तर उर्वरित ८० हजार रुपये ऑनलाइन पाठवले.

गुंडांनी हल्ला करीत नेले पळवूनलग्न झाल्याच्या आनंदात महेश आनंदाने साताऱ्याच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांच्याकडे लग्न झाल्याची कागदपत्रे, ३५ हजार रोख, कपड्यांची बॅग होती. रात्री ०८.३० वाजता त्यांची कार वाळूज परिसरात जाताच अचानक त्यांना रस्त्यात अडवण्यात आले. चारचाकीतून उतरलेल्या गुंंडांनी काचा फोडत चालकाला मारहाण केली. तेवढ्यात महेशकडील पैसे घेऊन दिशा व तिच्या बहिणीने धूम ठोकली. यात मोठे रॅकेटच असण्याचा संशय आहे. सर्व आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असून, लवकरच अटक केली जाईल, असे सहायक फौजदार सुभाष शेवाळे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी