शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेने पांघरली निळाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:42 IST

बाजारपेठेत जिकडे पाहावे तिकडे निळे झेंडे, निळे पताके, निळे फेटे, निळे दुपट्टे, निळे आकाशकंदिल आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे दिसत आहेत. जणू संपूर्ण बाजारपेठेनेच निळाई पांघरली आहे. आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठी अनुयायांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.

ठळक मुद्देजयंती : झेंडे, पताके, विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी

औरंगाबाद : बाजारपेठेत जिकडे पाहावे तिकडे निळे झेंडे, निळे पताके, निळे फेटे, निळे दुपट्टे, निळे आकाशकंदिल आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे दिसत आहेत. जणू संपूर्ण बाजारपेठेनेच निळाई पांघरली आहे. आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठी अनुयायांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी (दि.१४ एप्रिल) साजरी होेत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सजावटीचे विविध साहित्य विक्रीसाठी आले आहे. यात सर्वाधिक निळे झेंडे आहेत. पूर्वी मछली खडक, सिटी चौकातील बोटावर मोजण्याइतक्याच दुकानांत निळे झेंडे दिसत असत. मात्र, आता सिडको, हडको, टीव्ही सेंटर, आंबेडकरनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, रमानगर, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन परिसर, छावणी, बेगमपुरा, औरंगपुरा, पैठणगेट, क्रांतीचौक, पद्मपुरा अशा सर्व परिसरात अनेक स्टॉलवर निळे झेंडे विकले जात आहेत. पाव मीटरपासून ते ५ मीटरपर्यंतचे भव्य झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या झेंड्यावर अशोक चक्र आहेच, शिवाय यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रही बहुतांश झेंड्यांवर दिसते आहे. अनेक झेंड्यांवर ‘कलम का बादशहा’, ‘जय भीम’ ,‘ एकच साहेब बाबासाहेब’ असे प्रिंट करण्यात आले आहे. वाहनांवर, घरावर लावण्यासाठी तर कोणी कार्यक्रमाच्या स्थळी लावण्यासाठी झेंडे खरेदी करीत होते. सर्वत्र खरेदीत अपूर्व उत्साह दिसून आला, याशिवाय पंचशील ध्वजही मोठ्या संख्येने विक्री होताना दिसले. सजावटीच्या साहित्यात निळे पताके, निळी चमकी आहेच, शिवाय निळे दुपट्टे, निळ्या रंगाच्या टोप्या ज्यावर दोन्ही बाजूने ‘जय भीम’ प्रिंट केलेले आहे. अशा टोप्यांना तरुणवर्गात अधिक मागणी दिसून आली. मागील आठ दिवसांत लाखो रुपयांचा व्यवसाय झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.यंदानावीन्यपूर्ण आकाशकंदिल, फेट्यांचे आकर्षणमागील दोन वर्षांपासून डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळ्या रंगाचे आकाशकंदिल विक्रीला येत आहेत. यंदा या आकाशकंदिलामध्ये विविधता, नावीन्यता पाहण्यास मिळत आहे. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र, तसेच अशोक चक्र प्रिंट केलेले आकाशकंदिल हातोहात विक्री होत आहेत.यंदा पहिल्यांदाच निळ्या रंगातील फेटे विक्रीला आले आहेत. रेडिमेड फेट्यांची किंमत १०० ते १२० रुपयांदरम्यान आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती