शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांचा ‘जीव’ गुदमरतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 19:30 IST

आर्थिक उत्पन्नासाठी नव्या मार्गांचा शोध

- रऊफ शेख । 

फुलंब्री (औरंगाबाद ) : राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशामुळे व्यापाऱ्यांवरील नियंत्रण कमी झाले, शिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने मिळणारे आर्थिक उत्पन्नही आता बंद झाल्याने आता अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी बाजार समित्यांना नवीन उत्पन्नांचे मार्ग शोधावे लागत आहेत. यासंदर्भात फुलंब्री बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांच्याशी साधलेला संवाद. 

शासनाने बाजार समित्यांसंदर्भात कोणते नवीन आदेश काढले व त्या आदेशानुसार होणारे नुकसान काय?शासनाने काढलेल्या नवीन आदेशात बाजार समिती आवारात व्यापारी धोरण खुले केले. यात शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीचे नियंत्रण राहिलेले नाही, तसेच त्यांच्याकडून बाजार समिती फी आता वसूल करणे बंद करण्यात आले आहे. याचा मोठा आर्थिक फटका बाजार समितीला बसला आहे. 

बाजार समिती कुणाकडून फी वसूल करीत होती?बाजार समिती केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते. फी केवळ व्यापाऱ्यांकडून वसूल केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाप्रकारे फायदाच होत होता. आता उलट व्यापारी आपली मनमानी करीत असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही. त्यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे. यावर बाजार समितीचा दबाव नाही.   

बाजार समिती वसूल केलेल्या फीमधून कोणती कामे करीत होती? शेतकऱ्यांसाठी बाजार समिती यार्डात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात कमी दरात वजन काटा लावला. शेतकऱ्यांसाठी नाला बंडिंग तयार केल्या. रासायनिक खते बांधापर्यंत पोहोच केली. व्यापारी गाळे उभारले. 

बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न वाढविणे व अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणार? नियमित मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे बाजार समिती नवीन उत्पन्नांचे साधन तयार करीत आहे. बाजार समिती आवारात व वडोदबाजारमध्ये गाळे निर्माण करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मंगल कार्यालय उभारले असून, वजन काटा सुरू केला. यापासून नवीन उत्पन्नांचे साधन निर्माण केलेच, शिवाय येणाऱ्या काळात फळे, भाजीपाला खरेदी केंद्र सुरू करणे, कर्ज तारण योजना राबविणे, पेट्रोलपंप सुरू करणार, मुरघास प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. यातून आर्थिक उत्पन्नाचे मार्ग निर्माण होतील.

शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा का?  होय, शासनाने बाजार समितीबाबत जो निर्णय घेतला त्यात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान आहे. कारण बाजार समिती शेतकऱ्यांकडून फी वसूल करीत नाही. फी केवळ व्यापाऱ्यांकडून घेते, तसेच व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जात होते ते नियंत्रणात आता राहिलेले नाही. परिणामी, व्यापारी मनमानी पद्धतीने शेतमाल विकत घेत आहेत. 

शासनाच्या नवीन धोरणामुळे किती आर्थिक नुकसान झाले?बाजार समितीला मिळणारे पारंपरिक उत्पन्न बंद झाले. व्यापारी व जीनिंग यांच्याकडून बाजार समिती फी वसूल करीत होती. शासनाने काढलेल्या नवीन आदेशामुळे वर्षभरात ४० लाखांचे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना ब्रेक लागणार आहे. 

शासनाने घेतलेला निर्णय हा सहकार क्षेत्र मोडीत काढण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे व हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक आहे. यासाठी शासनाने नक्कीच फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहेच.शासनाच्या नवीन आदेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितावर टाच आली आहे. - संदीप बोरसे

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी