शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाड्याच्या समस्या त्याच; राज्यकर्ते मात्र नवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:14 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सिंचन, पाणी, वीज, जि.प. शाळा, दळणवळण, आरोग्याच्या मुद्यांचा घेतला बारकाईने आढावा 

औरंगाबाद : मराठवाड्यातील समस्या त्याच असून, त्यात फक्त राज्यकर्ते नवे हाच बदल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागातील सिंचन, पाणी, वीजपुरवठा, जि.प. शाळा, दळणवळण, आरोग्य, तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न गरुवारी दुपारपासून रात्री ८ वाजेपर्यंत केला. 

मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरणीमंत्री आदित्य ठाकरे यांनी या विभागाचा प्रथमच वैधानिकरीत्या आढावा घेतला. जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी टीमवर्कने काम करावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतील विविध समस्यांबाबतची बैठक झाली. शुक्रवारी उर्वरित जिल्ह्यांतील समस्यांचा आढावा घेण्यात येईल. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३०० जि.प. शाळांवरील छत दुरुस्त करा, शिर्डीकडे जाणारा रस्ता खराब आहे, जिल्ह्यात नव्याने आरोग्य केंद्र व्हावेत. पैठण रस्ता, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत लोकप्रतिनिधींनी मुद्दे उपस्थित केले. बैठकीला सर्व प्रशासकीय यंत्रणेसह शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या बैठकीत शेतकऱ्यांना विद्युत पंपाचे नवीन कनेक्शन, एचव्हीडीएसची अपेक्षित कामे, सोलार, ट्रान्सफॉर्मरची अपूर्ण कामे, औद्योगिक वसाहत प्रलंबित भूसंपादन, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची सद्य:स्थिती व त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली. २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी चार टप्प्यांत निधीची तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. ५० हून अधिक मुद्यांवर उस्मानाबादच्या लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. 

परभणी जिल्ह्यातील बैठकीत अंतर्गत रस्ते,  बंधारे आणि रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, मेडिकल कॉलेज सुरू करणे, कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासह भुयारी गटार योजनेबाबत मुद्दे मांडले. 

त्याच समस्या कायम आहेतमराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, सिंचन अनुशेष, हक्काचे पाणी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केलेल्या उपाययोजना, जि.प.च्या अखत्यारीत रस्त्यांची सद्य:स्थिती, दुरुस्ती आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या व होणाऱ्या कामांची सद्य:स्थिती, कृषिपंपासाठी पुरेसा वीजपुरवठा, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषधपुरवठा, पीक विमा योजनेचे उर्वरित अनुदान, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाबाबत मिळणाऱ्या असहकार्याबाबत लोकप्रतिनिधींनी बैठकीत ओरड केली. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाUddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळbusinessव्यवसाय