शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक जाधव यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

By सुमित डोळे | Updated: September 16, 2024 19:56 IST

क्रांतीनगरमध्ये राहणारे अशोक गोविंद जाधव गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते.

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीला अडकवलेली भाज्यांची पिशवी रस्त्यावर पडल्याने उचलण्यासाठी थांबलेल्या अशोक गोविंद जाधव (५५) यांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज, सोमवारी दुपारी खुलताबाद रस्त्यावर झाला. अशोक गोविंद जाधव हे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष होते. रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर रमानगर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

क्रांतीनगरमध्ये राहणारे अशोक गोविंद जाधव गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. ते पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष होते. आज, सोमवारी कामानिमित्त ते खुलताबादला गेले होते. तेथे भाजीपाला खरेदी करुन दुचाकीने पुन्हा घराकडे निघाले होते. खुलताबादच्या जवळ रस्त्यावर एका ठिकाणी त्यांची भाजीची पिशवी निसटून खाली पडली. ती घेण्यासाठी रस्त्यात थांबले असता पाठी मागून आलेल्या सुसाट ट्रकचालकाने त्यांना धडक देऊन पोबारा केला. स्थानिकांनी धाव घेत कदम यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अशाेक कदम यांच्या अपघाती मृत्यूने शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू