शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

निर्णय झाला पण मराठवाड्याला मिळणार केवळ ५.६ टीएमसीच पाणी

By बापू सोळुंके | Updated: October 30, 2023 19:39 IST

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी गोदापात्रात ८.६ टिएमसी सोडण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर: अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील समुह धरणातून मराठवाड्यासाठी गोदापात्रात केवळ ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय. सोडलेल्या पाणीजायकवाडी धरणापर्यंत पोहचताना ३५ टक्के पाणी जिरणार आहे. मराठवाड्याच्या पदरात केवळ ५.६ टीएमसीच पाणी पडणार आहे.

मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नांदेड, हिंगोली जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यातील लहान, मोठी धरणांनी तळ गाठला आहे. परिणामी आगामी काळात मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ४५ टक्के जलसाठा उरला आहे. तर जायकवाडीच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील समुह धरणांत ९०टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम आणि समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्केपेक्षा कमी जलसाठा असेल तर उर्ध्वभागातील धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडणे बंधनकारक आहे.याविषयीचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी घेणे बंधनकारक आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समुह धरणांतून ८.६ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य अभियंत्यांना दिले. सुत्रांनी सांगितले की, नगर आणि नाशिक जिल्हयातून मराठवाड्यासाठी गोदापात्रात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पात केवळ ५.६ टीएमसी एवढेच पाणी येणार आहेत. उर्वरित पाणी हे जमिनीत जिरणार आहे. 

३० ते ३२ टक्के पाणी जमिनीत जिरेल समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी मेढेगिरी फॉम्युर्ल्यानुसार सोमवारी मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समुह धरणातून सोडण्याचा निर्णय घेतला. नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीपर्यंत पाणी येईपर्यंत सोडलेल्या एकूण पाण्यापैकी सुमारे ३० ते ३२ टक्के पाणी जमिनीत जिरेल आणि आपल्याला ५.६ टीएमसी पाणी मिळेल.- एस.के. सब्बीनवार,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता

प्राथमिक  निर्णय आहे त्याचे स्वागतच करूमराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय कार्यकारी संचालकांनी त्यांच्यासमोर उपलब्ध आकडेवारीनुसार घेतला आहे.नाशिक पासून जायकवाडी प्रकल्पापर्यंत पाणी येईपर्यंत किती टक्के पाण्याचा लॉसेस होतो, याचा आढावा घेऊन पुढे पाणी सोडण्याचा निर्णय कमी, जास्त होऊ शकतो.- डॉ. शंकर नागरे, जलतज्ज्ञ.

पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकतामराठवाडा पाणी परिषदेच्या आंदोलनास प्रतिसाद देऊन जलसंपदा प्रशासन व शासनाने उर्ध्व  भागातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सोडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो .परंतु संबंधित आदेशाची विरोधाला न जुमानता त्वरित अंमलबजावणी करून दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.- नरहरी शिवपुरे, अध्यक्ष मराठवाडा पाणी परिषद

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीNashikनाशिक