शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात मुळा धरणाचे पाणी येणार सर्वात आधी; नगर, नाशिकमधून विसर्ग सुरु  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 12:41 IST

नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी अखेर मराठवाड्याच्या दिशेने झेपावले आहे.

औरंगाबाद : नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी अखेर मराठवाड्याच्या दिशेने झेपावले आहे. तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर दारणा, गंगापूर, निळवंडे, मुळा, मुकणे धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. यात सर्वात आधी मुळा धरणाचे पाणी जायकवाडीत पोहोचेल,अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

निळवंडे धरणातून ४२५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. गंगापूर धरणातून २ ११२, निळवंडे धरणातून ४२५०, मुळा धरणातून ६ हजार तर मुकणे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये २६ तासात मुळा धरणातील पाणी तर ३८ तासांत गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.  पालखेड धरणातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.

कुठून किती पाणी येणार निळवंडे धरणातून एकूण ३.८५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तर मुळा धरणातून १.९० टीएमएसी पाणी सोडण्यात येणार आहे. प्रारंभी ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर १० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तीन-चार दिवस याच वेगाने पाणी सोडणे सुरू राहील. याबरोबरच गंगापूर धरण समूहातून ०.६०, गोदावरी दारणा धरण समूहातून २.०४, तर पालखेड धरण समूहातून ०.६० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या पाण्याची गळती रोखण्यासाठी नदीकाठचा भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या १५ दिवसांतील घटनाक्रम

१५ आॅक्टोबर : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात बैठक. जायकवाडीची काढली तूट.

२२ आॅक्टोबर : हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक.

२२ आॅक्टोबर : जायकवाडीसाठी तात्काळ पाणी सोडण्याचे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे निर्देश.

२३ आॅक्टोबर : नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश.

२४ आॅक्टोबर : आमदार देवयानी फरांदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

२५ आॅक्टोबर : आदेशाच्या तिसऱ्या दिवशी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले; परंतु आधी निळवंडे धरणात पाणी साठविले.

२९ आॅक्टोबर : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान वरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध.

३१ आॅक्टोबर : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयातही कायम राखत निळवंडे आणि इतर धरणांमधून ८ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरणNashikनाशिकAhmednagarअहमदनगर